Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रावर 'तिहेरी' संकट! पुढचे ७२ तास महत्त्वाचे; मार्चअखेर उष्णतेची लाट, वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा

Published : Mar 28, 2026, 08:20 PM IST

Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात उष्णतेची लाट, अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचे तिहेरी संकट घोंघावत आहे. हवामान विभागाने पुढील ७२ तासांसाठी विदर्भ, कोकण, मराठवाडा यासह विविध भागांत अलर्ट जारी केला आहे. 

PREV
15
महाराष्ट्रावर 'तिहेरी' संकट! पुढचे ७२ तास महत्त्वाचे

मुंबई: मार्च महिना संपता संपता महाराष्ट्राच्या हवामानात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. राज्यावर एकाच वेळी उष्णतेची लाट, अवकाळी पाऊस आणि वादळी वारे असे तिहेरी संकट घोंघावत आहे. हवामान विभागाने पुढील ७२ तासांसाठी राज्याच्या विविध भागांत अलर्ट जारी केला असून, नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 

25
विदर्भ आणि कोकणात काय स्थिती?

कोकण (मुंबईसह): मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर सध्या प्रचंड उकाडा आणि दमट हवामान आहे. कमाल तापमान ३४ ते ३७ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असून, २९ मार्चपासून दक्षिण कोकणात तुरळक पावसाची चिन्हे आहेत.

विदर्भ: विदर्भात पारा ४० अंशांच्या पार गेला आहे. अकोला आणि अमरावतीत प्रचंड उष्णता असून भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. रविवारपासून संपूर्ण विदर्भात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. 

35
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 'वारं फिरणार'

मध्य महाराष्ट्र (पुणे, सातारा, कोल्हापूर): आज हवामान कोरडे असले तरी ३० मार्चपासून पुन्हा वारं फिरणार आहे. ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठवाडा: छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यात रविवारपासून वादळी पावसाचे पुनरागमन होईल. ३० ते ५० किमी वेगाचे वारे आणि विजांसह गारपीट होण्याची भीती असल्याने पिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

45
उत्तर महाराष्ट्रात तूर्तास दिलासा, पण...

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवस हवामान उष्ण आणि कोरडे राहील. मात्र, ३० मार्चनंतर येथेही अवकाळी पावसाचे संकट धडकण्याची शक्यता आहे. 

55
शेतकरी आणि नागरिकांसाठी महत्त्वाच्या टिप्स

१. शेतमाल सुरक्षित करा: कापणी झालेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा.

२. विजांपासून सावधान: वादळ सुरू असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात उभे राहू नका.

३. उन्हापासून बचाव: दुपारी १२ ते ४ या वेळेत काम टाळा आणि जास्तीत जास्त पाणी प्या.

मार्चअखेर होणारा हा बदल पिकांसाठी घातक ठरू शकतो, त्यामुळे हवामान खात्याच्या अपडेट्सकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories