यवतमाळ, नाशिकमध्ये कडाक्याचा उन्हामुळे दुष्काळाच्या झळा, महिलांची पाण्यासाठी वणवण (VIDEO)

Published : Apr 22, 2025, 08:03 AM ISTUpdated : Apr 22, 2025, 09:19 AM IST
Water Crisis in Maharashtra

सार

Water Crisis in Maharashtra : महाराष्ट्रातील यवतमाळ, नाशिक येथे वाढलेल्या उन्हामुळे विहिरीतील पाणी आटले आहे. अशातच महिलांना दररोज कडाक्याच्या उन्हातून दूरवर चालत जाऊन पाणी आणावे लागत असल्याची सध्याची स्थिती आहे.

Water Crisis in Maharashtra : यवतमाळ येथील अरणी जिल्ह्यातील गावातील महिलांना पाण्यासाठी दररोज वणवण करावी लागत आहे. वाढलेला तापमानाचा पारा पाहता विहिरी, नद्यांमधील पाणी आटले गेले आहे. अशातच महिलांना पाण्याची कमतरता सहन करत दररोज दूरवर जाऊन पाणी भरावे लागत आहे.

गावातील पूजा नावाच्या महिलेने सद्यच्या परिस्थितीची माहिती देत म्हटले की, “आम्हाला पडण्याची-घसरण्याची भीती वाटते. आम्ही दररोज पाणी टंचाईचा सामना करत आहोत. यामुळे 2-3 किलोमीटर दूरवर जाऊन पाणी आणावे लागत आहे.”

 

 

अशीच काहीशी स्थिती नाशिक येथील नागरिकांवर ओढावली आहे. नाशिकमधील तोंडवळ गावात भीषण पाणी टंचाईचा सामना महिला करत आहेत. येथील विहिरींमधील पाणी आटले गेल्याचे दिसतेय. महिलांनी पाणी टंचाईच्या परिस्थितीवर भाष्य करत म्हटले की, “गावामध्ये पाणीच नाही आहे. आम्हाला पाण्यासाठी भटकावे लागत आहे. आमच्या घरात लहान मुलं आहेत. आम्हाला पाण्याची गरज आहे.”

 

राष्ट्रवादी-एससीपी खासदार भास्कर भगरे यांनी नाशिकमधील भीषण पाणी टंचाईवर प्रतिक्रिया दिली आहे. भगरे यांनी म्हटले की, “मी काही गावांमध्ये गेलो आणि नागरिकांना भेटलो. नागरिक पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी मागत आहेत. याशिवाय रोजगारही मागत आहेत. या भागात 2000-2500 मिमीचा पाऊस होतो. पण उन्हाळ्यात येथे पाणीच नाही. हा मुद्दा मी संसदेत उपस्थितीत केला आहे. त्यांना पाणी पुरवण्यासाठी योजना असायला हवी.जल जीवन मिशन योजनेचे कामही सुरू आहे.”

याशिवाय बोरीची वाडी आणि उग गावामध्येही भीषण पाणी टंचाईचा सामना महिलांना करावा लागत नाही. पाण्यासाठी जीव धोक्यात घातला जात आहे. याशिवाय पाणी टंचाईच्या स्थितीत पाण्याची चोरी होऊ नये म्हणून त्यांना टाळे लावले जात आहे. जेणेकरुन खासगी टँकरकडून 600 रुपये प्रति लोडने पाणी विकत घ्यावे लागू नये. सरकारने आश्वासन देऊनही पाणी टंचाई अधिक भीषण होत चालली आहे. यामुळे दैनंदिन आयुष्य आणि उपजीविकेवर परिणाम होत असल्याचे स्थानिक गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

दुसऱ्या बाजूला नाशिकमध्ये भीषण उन्हामुळे तापमानाचा पारा 40 अंशापर्यंत पोहोचल्याची स्थिती आहे. यामुळे थोडावेळ नाशिकमधील स्थानिक प्रशासनाकडून जवळपास 30 सिग्लन बंद करण्यात आले होते. एवढ्या कडाक्याच्या उन्हामध्ये नागरिकांनी अनावश्यक कारणास्तव घराबाहेर पडू नये अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक