अजित पवार आणि पुण्यातील महिलेच्या झाली बाचाबाची, संवाद वाचून व्हाल थक्क

Published : Sep 14, 2025, 02:00 PM IST
ajit pawar

सार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील केशवनगर, मुंढवा भागात पाहणी केली असता नागरिकांनी त्यांच्यापुढे पाणी आणि रस्त्यांच्या समस्या मांडल्या. एका महिलेने तर त्यांना थेट आव्हान दिले की, वेळ न सांगता येऊन बघा म्हणजे कळेल.

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळपासून पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पहाटेपासून पुण्यातील केशवनगर, मुंढवा भागात पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी मुंढवा केशवनगर या उड्डाणपुलाची पाहणी केली. त्यासोबतच मुंढवा सिग्नल आणि हडपसर गाडीतळची देखील पाहणी केली. यावेळी अनेक नागरिकांनी अजित पवार यांच्यापुढे समस्या मांडल्या आहेत.

नागरिकांना पाणी मिळत नसल्याच्या केल्या तक्रारी 

मुंढवा आणि केशवनगर या ठिकाणी पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. रस्त्यांच्या अवस्थेतबाबत अजित पवार यांच्याकडे समस्या मांडली आहे. यावेळी मनोहर पर्रिकर जसे ट्रॅफिक पाहायला फिरायचे तसे तुम्ही पण फिरा असा सल्ला एका महिलेने अजित पवारांना दिला. वेळ न सांगता येऊन बघा म्हणजे कळेल असं म्हणत महिलेने थेट अजित पवारांना आव्हान दिलं.

अजित पवार महिलेला काय म्हणाले? 

यावेळी बोलताना अजित पवार यांनी महिलेला म्हटलं आहे की, मला मान्य आहे, माझ्याकडून चूक झाली, मात्र मला तुम्हाला सांगायचं आहे की, मी काम करायला आलो आहे. मला काम करू द्या. अजित पवारांचे महिला नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर उत्तर दिलं आहे.

महिलेत आणि अजित पवार यांच्यात काय संवाद झाला? 

अजित पवार - तुम्ही यायच्या आधी आम्ही सगळ्या समस्या ऐकल्या आहेत. त्यांनी निवेदन दिलेले आहे. यामध्ये वेगवेगळ्या एजन्सी आल्या आहेत. पीएमसी आहे, पीएमआरडीए, आत्ताच नागरिकांना त्याचा देणंघेणं नाहीये, त्यांना त्यांच्या सुविधा पाहिजे आहेत, त्याच्याशी आम्ही शंभर टक्के सहमत आहे. त्या संदर्भामध्ये आमचं काम सुरू आहे.आम्हाला उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही त्या कामांमध्ये अधिक कशी गती देता येईल या कामांना प्रायोरिटी कशी देता येईल हे पाहतो.

महिला- आम्हाला खूप आशा आहे. जसे पर्रीकर दिवसा फिरायचे ट्राफिक बघण्यासाठी तसेच तुम्ही कधीतरी ट्राफिकचा टाईम असतो, त्यावेळी येऊन बघायला पाहिजे, असं नाही की माहिती होऊ शकत नाही.

अजित पवार - (पर्रिकरांच नाव घेतल्यावर) पर्रिकर कोण?

महिला- गोव्याचे मुख्यमंत्री होते मनोहर पर्रीकर ते जसे फिरायचे दिवसा ट्राफिक बघण्यासाठी तसे तुम्ही कधीतरी फिरून बघा आणि न सांगता व्हिजिट करत चला. तुम्ही प्रश्न विचारणार आणि आम्ही सांगणार असं नको व्हायला.

अजित पवार - आम्ही प्रश्न विचारायला आलेलो नाही. मी स्वतः इथला परिसर ठीक व्हावा. सगळ्या समस्या सोडवल्या जाव्या यासाठी प्रयत्न करतोय.

महिला - असं नाही सर, इथल्या समस्या बघता इथे राहायचं की नाही हा प्रश्न पडलाय आम्हाला.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

अपघाताची बातमी वाचून डोळ्यापुढं येतील अंधाऱ्या, गोंदियातील अपघातात तिघांचा जागीच मृत्यू; ४० पेक्षा जास्त प्रवासी जखमी
Indigo Update : आजही शुक्रवारी शेकडो उड्डाणे रद्द, मुंबई-पुणे-नागपूरसह प्रमुख विमानतळांवर गोंधळ