Thane : अंगावर कुत्रा पडून जीव गेलेल्या चिमुरडीच्या प्रकरणातील आरोपीला अटक

Mumbai : मुंबईत मंगळवारी एका चार वर्षीय अल्पवयीन मुलीवर कुत्रा पडल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे.

Chanda Mandavkar | Published : Aug 9, 2024 7:39 AM IST / Updated: Aug 09 2024, 01:10 PM IST

Thane : ठाणे येथे 6 ऑगस्टला सना नावाच्या एका चार वर्षीय मुलीवर कुत्रा पडल्याने मृत्यू झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. खरंतर, इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन कुत्रा खाली पडल्याने चिमुरडीचा मृत्यू झाला. सदर घटना संध्याकाळच्या वेळेस घडल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात कुत्र्याचा मालक जहीर सईदला (24) ताब्यात घेण्यात आले आहे. याची माहिती मुंब्रा पोलीस (Mumbara Police Station) स्थानकातील वरिष्ठ निरिक्षक अनिल शिंदे यांनी दिली आहे. अनिल शिंदे यांनी म्हटले की, मृत मुलीच्या आई-वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिली प्रकरणाची माहिती
पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले की, आम्ही घटनेचा सखोल आढावा घेतला. त्यावेळी कळले कुत्रा सईदचा होता. सईदच्या बेजबाबदारपणामुळे मुलीचा मृत्यू झाला. खरंतर, कुत्रा इमारतीवरुन खाली कसा कोसळला गेला याचा शोध आम्ही घेत आहोत. याशिवाय आरोपीकडून कुत्र्याला छतावर ठेवले जात होते का याचीही माहिती मिळवली जात आहे. एवढेच नव्हे कुत्रा पाळण्यासाठी सईदकडे महापालिकेचा परवाना आहे की नाही याचाही शोध घेतोय. दरम्यान, घटनेत लॅब्राडोर प्रजातीच्या कुत्र्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या कुत्र्यावर उपचार सुरु आहेत.

घटनेचा व्हिडीओ व्हायरल
संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतेय की, ज्यावेळी चिमुरडी आईसोबत रस्त्याच्या बाजूने जात होती तेव्हाच वरुन खाली कुत्रा तिच्या अंगावर जोरात पडला. यावेळी आजूबाजूला असणाऱ्या नागरिकांनी नक्की काय झाले सुरुवातीला कळले नाही. पण चिमुरडीला काहीजण तातडीने घेऊन पुढे जाताना दिसून येत आहे. याशिवाय कुत्रा खाली पडल्यानंतर उठून उभा राहिल्याचेही दिसतेय.

आणखी वाचा : 

महिला डॉक्टर बाथरुममध्ये करत होती अंघोळ, पोलिसांनी केली सफाई कामगारावर कारवाई

दिल्लीत UPSC करणाऱ्या अंजलीने का केली आत्महत्या?, कारण घ्या जाणून

Share this article