बघा VIDEO, पिंपरी चिंचवडमध्ये दैवी चमत्कार, चक्क झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी हळद, कुंकू वाहिलं

Published : Jun 08, 2025, 03:22 PM ISTUpdated : Jun 08, 2025, 03:23 PM IST
pimpri

सार

हा दृश्य पाहून अनेकांनी तो चमत्कार मानला, झाडाला हार घातले, पूजाअर्चा सुरू केली, दर्शनासाठी गर्दी झाली. मात्र काही तासांतच या ‘चमत्काराचं’ सत्य समोर आलं आणि अंधश्रद्धेचा फुगा फुटला.

पिंपरी चिंचवड - सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये झाडाच्या खोडातून पाणी वाहताना दिसतंय. हा दृश्य पाहून अनेकांनी तो चमत्कार मानला, झाडाला हार घातले, पूजाअर्चा सुरू केली, दर्शनासाठी गर्दी झाली. मात्र काही तासांतच या ‘चमत्काराचं’ सत्य समोर आलं आणि अंधश्रद्धेचा फुगा फुटला.

व्हिडिओ सोशल मीडियावर

ही घटना आहे पिंपरी चिंचवड शहरातील प्रेमलोक पार्क परिसरातील आहे. रस्त्याकडेला असलेल्या एका झाडाच्या खोडातून अचानक पाणी येऊ लागल्याने परिसरातील नागरिक आश्चर्यचकित झाले. काहींनी या घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकला आणि बघता बघता तो व्हायरल झाला.

काहींनी झाडाला कुंकू, हळद लावलं

ही घटना पाहून अनेकांनी याला चमत्कार समजलं. काहींनी झाडाला कुंकू, हळद लावलं, हार घातले, झाडाच्या पाया पडायला गर्दी जमली. या झाडाभोवती पूजा सुरू झाली. काहींनी तर जलझऱ्यासारख्या झाडातून वाहणाऱ्या पाण्याला 'पवित्र' म्हणून बाटल्यांमध्ये भरून नेण्यास सुरुवात केली.

असा झाला सत्याचा उलगडा

घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पाहणी दरम्यान त्यांनी लक्षात घेतलं की, त्या झाडाच्या खालून एक पाण्याची पाईपलाईन जात होती. ती पाईपलाईन फुटल्यामुळे पाण्याचा प्रवाह झाडाच्या खोडातून बाहेर यायला लागला होता. म्हणजेच, तो ‘चमत्कार’ नसून शुद्ध यांत्रिक बिघाड होता.

अंधश्रद्धेच्या आधारावर गर्दी

या घटनेमागे वैज्ञानिक कारण असण्याची शक्यता ओळखून काही जागरूक नागरिकांनी याची माहिती महापालिकेला दिली. त्यामुळेच सत्य उघडकीस आलं आणि अंधश्रद्धेच्या आधारावर वाढणारी गर्दी रोखता आली.

 

 

शास्त्रीय दृष्टिकोन तपासा

या घटनेनंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट इशारा दिला आहे की, “चमत्कार म्हणून काहीही स्वीकारण्याआधी शास्त्रीय दृष्टिकोन वापरा. अन्यथा अज्ञानाचा फायदा घेऊन फसवणूक करणाऱ्यांचे हात बळकट होतात.”

विज्ञात युगातही अंधश्रद्धा

झाडातून पाणी वाहायला लागलं, हे पाहून ज्या वेगाने श्रद्धा उसळली, त्या वेगाने कारण विचारण्याची गरज का वाटली नाही? ही घटना पुन्हा एकदा सांगून जाते की, विज्ञानाच्या युगात देखील अंधश्रद्धा किती खोलवर रुजलेली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!