
मुंबईत एनसीपी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या बैठकीदरम्यान मराठवाड्यातील मुसळधार पावसाचा आढावा घेण्यात आला. छ. संभाजीनगर, नांदेड, जालना, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात आपत्कालीन उपाययोजना सुरू आहेत. सुनील तटकरे यांनी आपत्तीग्रस्त भागांना भेट देऊन मदतीचा आढावा घेणार असल्याचं सांगितलं. यासोबतच त्यांनी जीएसटी सुधारणा 2025 वर प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले.