
Soybean Registration 2025: खुल्या बाजारात सोयाबीनचे दर कमी असल्यामुळे अनेक शेतकरी आता सरकारी हमीभाव केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करणार आहेत. यासाठी नाफेडने शेतकऱ्यांसाठी सोयाबीन नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. आता शेतकरी ही नोंदणी ई-संमृद्धी मोबाईल ॲपच्या माध्यमातून सहज घरबसल्या करू शकतात.
Google Play Store वरून ॲप डाऊनलोड करा आणि ओपन करा.
2. मोबाईल नंबर लॉगिन करा:
आपला मोबाईल नंबर टाका आणि OTP द्वारे ॲपमध्ये लॉगिन करा.
3 आधार कार्ड तपशील भरा:
पूर्ण नाव आणि आधार क्रमांक भरून आधार फेस ऑथेंटिकेशन करा. यानंतर तुमची माहिती आपोआप भरली जाईल.
4. महत्त्वाची वैयक्तिक माहिती भरा:
शेतकऱ्याचे नाव, गाव, तालुका, जिल्हा
अल्पभूधारक असल्यास त्याची माहिती
प्रवर्ग
वडिलांचे नाव
आधार कार्डचा JPEG फोटो (10 MB पेक्षा कमी)
5. बँक डिटेल भरा:
अकाउंट होल्डरचे नाव
बँकेचा IFSC कोड
पासबुक फोटो (10 MB पेक्षा कमी)
6. सोयाबीन योजना निवडा:
सोयाबीनसाठी संबंधित योजना निवडा. ही सर्वात महत्त्वाची आणि शेवटची स्टेप आहे.
7. सातबारा दस्तऐवज अपलोड करा:
जिल्हा, तालुका, गाव, सर्वे नंबर, खाता क्रमांक यासह सातबारा अपलोड करा.
नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला यशस्वी नोंदणीचा पॉपअप आणि SMS प्राप्त होईल. या सोप्या स्टेप्स फॉलो करून शेतकरी नाफेडमध्ये सोयाबीन नोंदणी करून हमीभावावर विक्री सुनिश्चित करू शकतात.