होळी आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने सोलापूर विभागातील १० विशेष गाड्यांच्या फेऱ्या जुलै २०२६ पर्यंत वाढवल्या आहेत. या निर्णयामुळे मुंबई, पुणे आणि आंध्र प्रदेशकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सोलापूर : आगामी होळीचा सण आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. सोलापूर विभागातून धावणाऱ्या १० विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या आता जुलै २०२६ पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. यामुळे मुंबई, पुणे आणि आंध्र प्रदेशच्या दिशेने जाणाऱ्या हजारो प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर आणि नियोजित होणार आहे.
25
मुंबईकरांसाठी मोठी सोय, सोलापूर-LTT विशेष गाडी
सोलापूर ते मुंबई या मार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या पाहता, सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) या साप्ताहिक विशेष गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे.
गाडी क्र. ०१४३५ (सोलापूर - LTT): ही गाडी आता दर मंगळवारी १४ जुलै २०२६ पर्यंत धावणार आहे.
गाडी क्र. ०१४३६ (LTT - सोलापूर): परतीच्या प्रवासासाठी ही गाडी दर बुधवारी १५ जुलै २०२६ पर्यंत उपलब्ध असेल.
35
दक्षिण भारताची वारी झाली सोपी, अनकापल्ले स्पेशल
आंध्र प्रदेशातील अनकापल्ले येथे जाणाऱ्या भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण भारताकडे जाणाऱ्या गाड्यांचा कालावधीही वाढवला आहे.
गाडी क्र. ०१४७७ (सोलापूर - अनकापल्ले): ही साप्ताहिक गाडी दर शुक्रवारी १० जुलै २०२६ पर्यंत धावेल.
गाडी क्र. ०१४७८ (अनकापल्ले - सोलापूर): ही गाडी दर शनिवारी ११ जुलै २०२६ पर्यंत आपली सेवा देईल.
दैनिक प्रवाशांनाही दिलासा, 'या' गाड्यांची सेवा कायम
नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अनारक्षित दैनिक विशेष गाड्यांची मुदत १५ जुलै २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
सोलापूर - दौंड (०१४६१/०१५६२)
सोलापूर - कलबुर्गी (०१४६५/०१४६६)
हडपसर - हरंगूळ (०१४८७/०१४८८)
55
वेटिंग लिस्टच्या कटकटीतून सुटका!
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये नियमित गाड्यांचे आरक्षण महिनाभर आधीच फुल्ल होते. अशा वेळी या १० विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणे सोपे होईल आणि वेटिंग लिस्टचा त्रास कमी होईल. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे सोलापूरसह दौंड, कलबुर्गी आणि लातूर मार्गावरील प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.