Smart Ration Card : कागदी रेशनकार्डला रामराम; स्मार्ट शिधापत्रिकेमुळे शिधावाटप होणार डिजिटल आणि पारदर्शक

Published : Feb 23, 2026, 11:04 AM IST
Smart Ration Card

सार

Smart Ration Card : स्मार्ट रेशन कार्ड योजना लवकरच सुरू होणार आहे. पीव्हीसी स्वरूपातील एटीएमसारखे दिसणारे कार्ड क्यूआर कोड आणि ई-स्वाक्षरीसह दिले जाणार आहे. बायोमेट्रिक पडताळणीमुळे डुप्लिकेट नावे आणि गैरवापर थांबवण्याचा प्रयत्न आहे. 

Smart Ration Card : सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि बनावट लाभार्थ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पारंपरिक कागदी रेशनकार्डांच्या जागी आता स्मार्ट रेशन कार्ड योजना लागू करण्यात येणार असून फेब्रुवारीनंतर या कार्डांचे वाटप सुरू होणार आहे. या नव्या योजनेमुळे शिधावाटप प्रक्रियेत डिजिटल बदल घडणार असून गैरप्रकारांना मोठा आळा बसेल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

कसं असणार स्मार्ट रेशन कार्ड?

नवीन स्मार्ट रेशन कार्ड एटीएम कार्डसारख्या पीव्हीसी स्वरूपात असेल. हे कार्ड मजबूत आणि टिकाऊ असेल. त्यावर क्यूआर कोड आणि ई-स्वाक्षरी असणार आहे. कार्ड स्कॅन केल्यावर लाभार्थ्यांची माहिती तत्काळ उपलब्ध होईल. त्यामुळे अचूक ओळख पटवणे सोपे होणार आहे.

क्यूआर कोड आणि बायोमेट्रिक पडताळणीची सुविधा

धान्य घेताना लाभार्थ्यांना रेशन दुकानात बायोमेट्रिक पडताळणी करावी लागणार आहे. बोटांचे ठसे दिल्यानंतरच धान्य वितरित केले जाईल. यामुळे एकाच व्यक्तीने दोनदा धान्य घेणे, बनावट नोंदी करणे किंवा डुप्लिकेट कार्ड वापरणे अशा प्रकारांना आळा बसणार आहे. डिजिटल पडताळणीमुळे शिधावाटप अधिक पारदर्शक होईल.

टप्प्याटप्प्याने वितरणाची तयारी

शहरात चिंचवड अ, पिंपरी ज आणि भोसरी क अशी तीन परिमंडळे आहेत. या भागांतील सुमारे 4 लाख 23 हजार लाभार्थी 260 रेशन दुकानांमधून धान्य घेतात. सर्वांना एकाचवेळी कार्ड न देता टप्प्याटप्प्याने वितरण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे प्रक्रिया सुरळीत पार पडेल आणि नागरिकांना अडचणी येणार नाहीत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Melghat Accident : मेळघाटात भीषण अपघात; धारणी तालुक्यात पिकअप ५० फूट दरीत कोसळली, ५ ठार
Budget Session : विधानसभेचे अधिवेशन आजपासून सुरू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार राज्याचा अर्थसंकल्प