Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी नेते शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका, म्हणाले- घटनादुरुस्तीच उत्तम पर्याय

Published : Aug 31, 2025, 08:59 AM IST
Sharad Pawar

सार

मराठा आरक्षणावरुन काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. शरद पवारांनी म्हटले की, या मुद्द्यावर संसदेत घटनादुरुस्ती हाच उत्तम पर्याय आहे. 

मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. राज्यघटनेत आरक्षणाची मर्यादा आणि त्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय यामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातच आरक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे या समस्येचे समाधान संसदेत घटनादुरुस्ती करूनच शक्य असल्याचे पवार यांनी सांगितले. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, **आरक्षणाची मर्यादा वाढविणे हा उत्तम पर्याय आहे.**

तामिळनाडूचे उदाहरण पुढे केले

पवार म्हणाले, "आरक्षणाची मर्यादा ५० ते ५२ टक्के ठेवली असली, तरी तामिळनाडू सरकारने तब्बल ७२ टक्के आरक्षण लागू केले आहे. हे प्रकरण न्यायालयात गेले असले तरी तामिळनाडू सरकारला त्यात यश मिळाले. त्यामुळे मर्यादेपलीकडे आरक्षण देता येत नाही, हा युक्तिवाद पूर्णपणे ग्राह्य धरता येत नाही."

जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात भाष्य

शनिवारी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्यात शरद पवार बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार नीलेश लंके, आमदार सत्यजित तांबे, हेमंत ओगले, मोनिका राजळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संसदेतच सोडवावा लागेल प्रश्न

पवार यांनी ठामपणे सांगितले की, "महाराष्ट्रातील आरक्षणाचा तिढा आता संसदेतच सोडवावा लागेल. यासाठी आम्ही पुढाकार घेऊन चर्चा सुरू केली आहे. आरक्षणासंबंधी केंद्र सरकारने पारदर्शक भूमिका घेणे आवश्यक आहे. सर्व संबंधित राज्यांशी चर्चा करून संसदेत ठोस निर्णय घेणे हाच मार्ग आहे."

सामाजिक ऐक्य धोक्यात?

आरक्षणाच्या वादामुळे समाजात कटुता निर्माण होत असल्याचेही पवार यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, “सध्या मराठा विरुद्ध ओबीसी अशी चर्चा सुरू झाली आहे. या दोन्ही समाजांमध्ये मागासलेपण आणि अडचणी आहेत. मराठा समाजातील मोठा वर्ग शेतीवर अवलंबून आहे, पण शेतीतूनही त्यांना प्रगती साधता येत नाही. त्यामुळे त्यांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची गरज आहे.”

PREV
Read more Articles on

Recommended Stories

महाराष्ट्रात 'थंडीचा कहर'! तापमान 'मायनस'मध्ये जाणार; 'या' ३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट, तुमच्या शहराचं तापमान तपासा!
मोठी बातमी! नवी मुंबईकरांसाठी 'जॅकपॉट'! तुमच्या प्रवासात होणार 'हा' सर्वात मोठा बदल; दोन नवीन रेल्वे स्थानकांची घोषणा!