शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक सन्मान! युनेस्कोचे 'ते' ऐतिहासिक प्रमाणपत्र अखेर भारताच्या स्वाधीन; १२ किल्ल्यांचा डंका आता जगभर

Published : Feb 12, 2026, 07:37 PM ISTUpdated : Feb 12, 2026, 07:38 PM IST
Maratha Forts World Heritage

सार

Maratha Forts World Heritage: छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया या १२ किल्ल्यांच्या समुहाला युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. पॅरिसमध्ये झालेल्या सोहळ्यात मंत्री आशिष शेलार यांनी हे मानांकन-पत्र स्वीकारले. 

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धकौशल्याचा आणि अभेद्य दुर्गबांधणीचा वारसा आता अधिकृतपणे 'जागतिक वारसा' (World Heritage) म्हणून जगाच्या नकाशावर कोरला गेला आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील युनेस्को (UNESCO) मुख्यालयात आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात, महाराष्ट्राच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देणारे अधिकृत प्रमाणपत्र आज राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड. आशिष शेलार यांनी स्वीकारले.

'मराठा मिलिटरी लँडस्केप'चा जागतिक गौरव

११ जुलै २०२५ रोजी युनेस्कोच्या ४७ व्या अधिवेशनात ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया’ या नावाने शिवकाळातील किल्ल्यांच्या साखळीला जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले होते. या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर आज त्याचे मानांकन-पत्र प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या हाती आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ आणि तमिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांचा समावेश आहे.

गडकोट: रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर.

जलदुर्ग: सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी.

दक्षिण दिग्विजय: जिंजी (तमिळनाडू).

 

 

पॅरिसमध्ये घुमला शिवरायांच्या पराक्रमाचा आवाज

फेब्रुवारी २०२५ मध्ये महाराष्ट्र सरकारच्या शिष्टमंडळाने पॅरिसमध्ये केलेल्या तांत्रिक मांडणीला मोठे यश मिळाले आहे. हे प्रमाणपत्र स्वीकारताना मंत्री आशिष शेलार भावूक झाले. ते म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि मराठा साम्राज्याचा वारसा हा केवळ महाराष्ट्राचा नाही, तर संपूर्ण जगाचा आदर्श आहे. हा सन्मान स्वीकारताना प्रत्येक शिवप्रेमीचा ऊर अभिमानाने भरून येईल." या यशाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाचे आभार मानले.

युनेस्कोमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

पॅरिस दौऱ्यादरम्यान मंत्री शेलार यांनी युनेस्को मुख्यालयात नुकत्याच बसवण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने हा पुतळा महाराष्ट्र सरकारने युनेस्कोला भेट दिला आहे. समता, न्याय आणि बंधुतेचा विचार देणाऱ्या महामानवाचे स्मारक आता युनेस्कोच्या जागतिक व्यासपीठावर दिमाखाने उभे आहे.

या निर्णयाचे महत्त्व काय?

पर्यटनाला चालना: जागतिक वारसा दर्जा मिळाल्यामुळे या किल्ल्यांकडे विदेशी पर्यटकांचा ओढा वाढेल.

संवर्धनासाठी निधी: युनेस्कोच्या निकषांमुळे किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान आणि निधी उपलब्ध होण्यास मदत होईल.

इतिहासाची ओळख: शिवरायांची 'गनिमी कावा' ही युद्धनीती आणि स्थापत्यशास्त्र जागतिक स्तरावर अभ्यासाचा विषय बनेल.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक