Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल

Published : Oct 09, 2026, 11:34 AM IST
Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल

सार

भिवंडीत एका मिठाईच्या दुकानात गुलाबजामच्या पाकात उंदीर पोहत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) दुकानावर छापा टाकला. नवी मुंबई आणि मुंबईतही अस्वच्छतेमुळे अनेक हॉटेल्सवर नुकतीच कारवाई झाली आहे.

मुंबई : महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) अस्वच्छ हॉटेल्स आणि दुकानांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. बुधवारी भिवंडीत एका मिठाईच्या दुकानात चक्क गुलाबजामच्या पाकात उंदीर पोहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पाकात पडलेला हा उंदीर बाहेर पडण्यासाठी धडपडत होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर FDA च्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेतली. ही घटना महाराष्ट्रातील भिवंडी जिल्ह्यात घडली आहे.

भिवंडीच्या गैबी नगर भागात असलेल्या 'हरीश गुलाब जामुन' या दुकानावर FDA च्या टीमने छापा टाकला. पुढील तपास पूर्ण होईपर्यंत हे दुकान बंद ठेवण्याचे आदेशही अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या महिन्याच्या सुरुवातीलाच नवी मुंबईतील आठ हॉटेल्सचे परवाने FDA ने रद्द केले होते. तिथे कृत्रिमरीत्या पिकवलेली १.३ मेट्रिक टन केळी, बेकायदेशीर गुटखा आणि भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आलं होतं. याशिवाय, मुंबईतील तीन दुकानांमधून ३१.१४ लाख रुपयांचे बंदी असलेले अन्नपदार्थ जप्त करत तीन जणांना अटक करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात मुंबईत एका हॉटेलमध्ये म्हैसूर मसाला डोश्यामध्येही मेलेला उंदीर सापडल्याची संतापजनक घटना घडली होती.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'