पुणेकरानो लक्ष द्या! शिवजयंतीनिमित्त उद्या 'हे' मुख्य रस्ते राहणार बंद; घराबाहेर पडण्यापूर्वी पाहा पर्यायी मार्गांचा 'मॅप'

Published : Feb 18, 2026, 08:26 PM IST
traffic changes

सार

१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त पुण्याच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका निघणार आहेत. यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक विभागाने लक्ष्मी रोड, शिवाजी रोडसह अनेक प्रमुख रस्ते बंद ठेवले असून प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग जाहीर केले आहेत.

पुणे : उद्या, १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यानिमित्त पुण्याच्या मध्यवर्ती भागात भव्य मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि मिरवणुका विनाअडथळा पार पडाव्यात, यासाठी पुणे शहर वाहतूक विभागाने वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. अनेक प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले असून प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

वाहतुकीसाठी 'हे' रस्ते असतील बंद/वळवलेलेमिरवणुकीच्या काळात लक्ष्मी रोड, शिवाजी रोड, बाजीराव रोड आणि पंडित नेहरू रोड यांसारख्या मुख्य मार्गांवर प्रवेशबंदी असेल. विशेषतः जड वाहनांना या परिसरात पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.

कुठे जायचे असेल तर 'हा' मार्ग निवडा

सध्याचा मार्ग (बंद) पर्यायी मार्ग (खुला)

शिवाजी रोड (जिजामाता चौक) स. गो. बर्वे चौक जंगली महाराज रोड खंडोजीबाबा चौक टिळक रोड.

बाजीराव रोड (पूरम चौक)टिळक रोड अलका टॉकीज फर्ग्युसन कॉलेज रोड.

गणेश रोड (दारूवाला पूल)दारूवाला पूल चौकातूनच पर्यायी मार्गांनी वाहतूक वळवली जाईल.

अप्पा बळवंत चौक (बुधवार पेठ)मिरवणूक असेपर्यंत केळकर रस्त्याने थेट पुढे जावे.

लक्ष्मी रोड (सोन्या मारुती चौक)संत कबीर चौकातून वाहने पर्यायी मार्गाकडे वळवण्यात येतील.

महत्त्वाच्या सूचना

बालगंधर्व परिसर: मिरवणूक गाडगीळ पुतळ्याच्या पुढे जाईपर्यंत सावरकर भवन पुलावरून बालगंधर्वच्या दिशेने वाहतूक सोडली जाईल.

आपत्कालीन सेवा: रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांना मिरवणुकीतही प्राधान्य दिले जाईल.

आवाहन: वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी नागरिकांना मध्यवर्ती भागात शक्यतो वाहने न आणण्याचे आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

शिवजयंतीच्या जल्लोषात सहभागी होताना आपले प्रवासाचे नियोजन आधीच करून ठेवा, जेणेकरून वेळेचा अपव्यय टाळता येईल.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक