Pune Night Bus Service: पुणेकरांसाठी खुशखबर! रात्रीची चिंता संपली; ‘या’ 6 मार्गांवर धावणार पीएमपीची सुरक्षित ‘रातराणी’ सेवा

Published : Oct 30, 2025, 06:02 PM IST
Pune Night Bus Service

सार

Pune Night Bus Service: पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) 'रातराणी' नाईट बस सेवा पुन्हा सुरू केली आहे. ही सेवा सहा प्रमुख मार्गांवर धावणार असून, कामगार, विद्यार्थी आणि महिलांसाठी रात्रीचा सुरक्षित आणि परवडणारा प्रवास उपलब्ध करून देईल. 

Pune Night Bus Service: रात्री उशिरा घरी जाणं, नाईट शिफ्ट संपल्यानंतर प्रवासाची धडपड किंवा महागड्या कॅब्सचा खर्च हे सगळं आता इतिहासजमा होणार आहे! पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) ‘रातराणी’ बस सेवा पुन्हा सुरू केली असून, आता नागरिकांना मध्यरात्रीनंतरही शहरभर सहज प्रवास करता येणार आहे.

रात्रीच्या प्रवाशांसाठी सुरक्षित आणि परवडणारी सेवा

रातराणी बस सेवा ही कामगार, विद्यार्थी, महिला प्रवासी आणि नाईट शिफ्टमधील कर्मचाऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. सुरक्षितता, परवडणारा भाडे आणि वेळेवर उपलब्धता या तीनही बाबींचा समतोल साधणारी ही सेवा शहराच्या नाईटलाइफचा अविभाज्य भाग बनत आहे.

‘या’ सहा मार्गांवर धावणार रातराणी बस

PMPML ने खालील सहा प्रमुख मार्गांवर नियमित रातराणी बस सेवा सुरू केली आहे.

कात्रज – वाकडेवाडी (नवीन एसटी स्थानक)

कात्रजहून : ११.३०, ०१.३०, ०३.३०

वाकडेवाडीहून : १२.३०, ०२.३०, ०४.३०

कात्रज – पुणे स्टेशन

कात्रजहून : ११.००, १२.३०, ०२.००, ०३.२५

पुणे स्टेशनहून : ११.५०, ०१.२०, ०२.४०, ०४.१०

हडपसर – स्वारगेट

हडपसरहून : १०.२०, ११.४०, ०१.००, ०३.४५

स्वारगेटहून : १०.५०, १२.२०, ०१.४०, ०४.१५

हडपसर – पुणे स्टेशन

हडपसरहून : १०.२०, ११.४०, ०१.००, ०३.४५

पुणे स्टेशनहून : १०.५०, १२.२०, ०१.४०, ०४.१५

निगडी – पुणे स्टेशन (वाकडेवाडी मार्गे)

निगडीहून : ११.३०, ०१.३०, ०३.३०

पुणे स्टेशनहून : १२.३०, ०२.३०, ०४.३०

पुणे स्टेशन – कोंढवा गेट

पुणे स्टेशनहून : १०.००, १२.३०, ०३.४५

कोंढवा गेटहून : ११.१५, ०१.४५, ०५.००

सुरक्षेचा उच्च दर्जा

या सर्व रातराणी बसमध्ये महिलांसाठी राखीव जागा, सीसीटीव्ही कॅमेरे आणि GPS ट्रॅकिंग सिस्टम बसवण्यात आली आहे. म्हणूनच प्रवाशांना आता रात्रीचा प्रवासही निर्धास्तपणे आणि सुरक्षितरीत्या करता येईल.

पुणेकरांसाठी मोठा दिलासा

शहरातील वाढत्या प्रवासाच्या गरजा लक्षात घेता PMPML ने केलेलं हे नियोजन केवळ वाहतूक सुलभ करणार नाही, तर खासगी वाहनं आणि कॅब्सवरील अवलंबित्व कमी करेल. “रातराणी” म्हणजे आता प्रत्येक पुणेकरासाठी विश्वासाची रात्रभर धावणारी सोबती!

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Indigo Update : आजही शुक्रवारी शेकडो उड्डाणे रद्द, मुंबई-पुणे-नागपूरसह प्रमुख विमानतळांवर गोंधळ
माझो वरली महागडी गं, रिअल इस्टेटमध्ये न्यूयॉर्कच्या लोअर मॅनहॅटनशी होतेय तुलना, अपार्टमेंटची किंमत 1 लाख रुपये प्रति चौरस फूट