Lonavala Bhusi Dam Family Drown in Waterfall : भुशी डॅम परिसरात वाहून गेलेल्या पाच जणांपैकी चौघांचे सापडले मृतदेह, एकाचा शोध सुरू

Published : Jul 01, 2024, 12:30 PM IST
Lonavala Bhusi Dam

सार

Lonavala Bhusi Dam Family Drown in Waterfall : लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात वाहून गेलेल्या पाच जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू आहे. 

Lonavala Bhusi Dam Family Drown in Waterfall : पुणे : भुशी डॅम परिसरात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल येथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेलं आहे. वाहून गेलेल्या पाच जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले असून अद्याप एकजण बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे.

जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी घटनास्थळी दिली भेट

वर्षा पर्यटनासाठी लोणावळ्याला गेलेले 10 जण जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेले होते. त्यापैकी 5 जणांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर पडण्यात यश आलं आहे. बुडालेल्या 5 जणांपैकी 4 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर एक अद्याप बेपत्ता आहेत. उर्वरित शोधकार्य सोमवारी करण्यात येणार आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातल्या धबधब्यातून हे पाच जण वाहून गेले आहेत. हे सर्वजण अन्सारी कुटुंबातले आहेत. यात लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी सुहास दिवसे घटनास्थळी पोहोचले आहेत.

'अन्सारी कुटुंबाला पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना'

भुशी डॅमजवळ वाहून गेलेल्यांना वाचवण्यासाठी ज्यांनी बचावकार्य केलं, त्या शिवदुर्ग टीममधील गावडे यांनी सांगितलं की, "पाऊस जास्त झाल्यानंतर लोणावळ्याकडे पर्यटक येत असतात. असंच हे कुटुंब होतं. हे कुटुंब एका लग्नसमारंभासाठी आलं होतं. समारंभ पार पडल्यापासून ते भुशी डॅमजवळ असलेल्या धबधब्यावर आले. इथे साधारणतः दुपारी साडेबाराच्या सुमारास ते गेले होते. या ठिकाणी अचानक पाऊस वाढला. या ठिकाणी 15 मिनिटांसाठी जरी पाऊस पडला तरीदेखील धबधब्याचं पाणी मोठ्या प्रमाणावर वाढतं. या पाण्याचा या कुटुंबाला अंदाज आला नाही त्यामुळेच दुर्घटना घडली. हा धबधबा पुढे जाऊन भुशी डॅमला मिळतो. आम्हाला आतापर्यंत सापडलेले मृतदेह सर्व भुशी डॅमच्या बॅकवॉटरमध्ये सापडले आहेत. आणि इतर दोघांचा शोध सुरू आहे."

"आम्हाला या दुर्घटनेची माहिती मिळाली. त्यावेळी आम्ही त्वरित आमची टीम घेऊन याठिकाणी पोहोचलो. त्यानंतर आम्हाला भुशी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये तीन मृतदेह आढळले. भुशी डॅममध्ये आम्हाला एका महिलेचा मृतदेह, एक 13 वर्षीय मुलीचा मृतदेह आणि सात वर्षांचा मृतदेह सापडला. अशा तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. रात्री साडेसात वाजेपर्यंत बचावकार्य सुरू होतं. पण अंधार पडल्यामुळे आम्हाला सर्च ऑपरेशन थांबवावं लागलं. ज्या ठिकाणी डेडबॉडी सापडल्यात त्याच ठिकाणी आप सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.", अशी माहिती बचावकार्य करणाऱ्यांनी केली आहे.

आणखी वाचा :

Farmer Suicide in Vidarbha : विदर्भात दोन दिवसांत पाच शेतकऱ्यांची आत्महत्या

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Pune Cab Dispute : पुण्यात आयटी तरुणीचा ३०० रुपये कॅब भाडं देण्यास नकार, ड्रायव्हरला दिली पोलिसांची धमकी
Wardha Doctor Slapped : पोलिसांसमोरच आरोपीने महिला डॉक्टरच्या कानशिलात लगावली, CCTV व्हिडिओ व्हायरल