पुणेकरांनो सावधान! रमजाननिमित्त कोंढव्यातील वाहतूक मार्गांत मोठे बदल; घराबाहेर पडण्यापूर्वी पाहा पर्यायी रस्ते

Published : Feb 22, 2026, 06:53 PM IST
traffic changes

सार

पवित्र रमजान महिन्यानिमित्त पुण्यातील कोंढवा परिसरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. दररोज सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत जड वाहनांना ठराविक मार्गांवर प्रवेशबंदी लागू करण्यात आली. 

पुणे : पवित्र रमजान महिन्यानिमित्त कोंढवा परिसरात होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. इफ्तारच्या वेळी होणारी गर्दी आणि अरुंद रस्ते लक्षात घेता, या भागातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, जड वाहनांना ठराविक वेळेत प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.

बदलांची वेळ आणि कालावधी

हे नवे नियम रमजान महिना संपेपर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहतील. विशेषतः शीतल पेट्रोल पंप, कौसरबाग आणि पारगेनगर या भागात खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.

जड वाहनांसाठी 'नो एन्ट्री'

वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी खालील मार्गांवर ट्रक, टँकर यांसारख्या जड वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.

कौसरबाग परिसर: ज्योती हॉटेल चौक ते मेफेअर सोसायटी आणि पारगेनगर दरम्यान जड वाहनांना पूर्णतः बंदी.

सर्वोदय चौक: या चौकातून कौसरबागेकडे जाणाऱ्या रस्त्यावर जड वाहनांना प्रवेश मिळणार नाही.

प्रवासासाठी 'हे' आहेत पर्यायी मार्ग

वाहनचालकांचा वेळ वाचवण्यासाठी पोलिसांनी खालील पर्यायी मार्ग सुचवले आहेत.

१. जड वाहनांसाठी: मेफेअर सोसायटी चौक ते ज्योती हॉटेल चौक या मार्गाचा वापर करावा.

२. इतर वाहनांसाठी: प्रवाशांनी ज्योती हॉटेल चौक, शीतल पेट्रोल पंप चौक आणि पारगेनगर या मार्गांचा अवलंब करावा.

महत्त्वाची माहिती

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांसोबतच स्थानिक स्वयंसेवकही रस्त्यावर तैनात असणार आहेत. वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी पुणेकरांना या बदलांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Baramati Rahuri Assembly Bypoll Election: महाराष्ट्रात निवडणुकीचा धुरळा! बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं; 'या' दिवशी होणार मतदान!
Hadapsar Railway Station: पुणेकरांची 'लाईफलाईन' सुसाट! हडपसर रेल्वे स्थानकाचा कायापालट; आता चौथ्या प्लॅटफॉर्मला ग्रीन सिग्नल!