Pune Viral Video : पुण्यात आयटी इंजिनिअर महिलेला बाईक टॅक्सी चालकाने अर्ध्या रस्त्यात उतरवले

Published : Oct 25, 2026, 11:36 AM IST
Pune Viral Video : पुण्यात आयटी इंजिनिअर महिलेला बाईक टॅक्सी चालकाने अर्ध्या रस्त्यात उतरवले

सार

पुण्यात एका आयटी इंजिनिअर महिलेने बाईक टॅक्सी चालकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. चालकाने तिला अर्ध्या रस्त्यात उतरवून भाड्यावरून वाद घातला आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पुणे : शहरात एका ४२ वर्षीय आयटी इंजिनिअर महिलेने बाईक टॅक्सी चालकावर गंभीर आरोप केले आहेत. चालकाने तिला अर्ध्या रस्त्यात उतरवून तिच्याशी हुज्जत घातली आणि या वादाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर महिलेने थेट पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली आहे.

पूजा दीपक साव (वय ४२) असं या तक्रारदार सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेचं नाव आहे. दुपारी १ च्या सुमारास हिंजवडी येथील ऑफिसला जाण्यासाठी त्यांनी बाईक टॅक्सी बुक केली होती. पूजा यांनी चालकाला सूसमधील 'सनीज वर्ल्ड' मार्गे जाण्यास सांगितलं. पण चालकाने नकार दिला आणि कंपनीच्या ॲपने दाखवलेल्या मार्गानेच जाण्याचा हट्ट धरला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

हा वाद तेव्हा जास्त वाढला जेव्हा चालकाने बावधन पुलावर गाडी थांबवली आणि पूजा यांना तिथेच उतरण्यास सांगितलं. एवढंच नाही तर त्याने पूर्ण भाड्याची मागणीही केली. प्रवास पूर्ण झाला नसताना मी पैसे का देऊ, असा सवाल करत पूजा यांनी पैसे देण्यास नकार दिला. हा वाद सुरू असताना चालकाने मोबाईलवर व्हिडिओ काढला. मला बदनाम करण्याच्या हेतूने त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याचा आरोप पूजा यांनी केला आहे.

पाहा व्हायरल व्हिडिओ

या प्रकारानंतर पूजा साव यांनी बावधन पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी या प्रकरणी अदखलपात्र (NC) गुन्ह्याची नोंद झाल्याची माहिती दिली आहे. या घटनेमुळे बाईक टॅक्सी चालकांची मुजोरी आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत असून लवकरच पुढील कारवाई केली जाईल.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Pune Cab Dispute : पुण्यात आयटी तरुणीचा ३०० रुपये कॅब भाडं देण्यास नकार, ड्रायव्हरला दिली पोलिसांची धमकी
Wardha Doctor Slapped : पोलिसांसमोरच आरोपीने महिला डॉक्टरच्या कानशिलात लगावली, CCTV व्हिडिओ व्हायरल