पुणे : नोकरी-व्यवसायानिमित्त पुण्यात स्थायिक झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. होळीच्या सणाला गावी जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने पुणे स्थानकावरून विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. यामुळे उत्तर भारत आणि विदर्भाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
होळीच्या काळात नियमित गाड्यांचे वेटिंग लिस्ट वाढते, हे लक्षात घेऊन रेल्वेने दानापूर, गोरखपूर, गाझीपूर शहर, नागपूर आणि हजरत निजामुद्दीन या महत्त्वाच्या मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.