मध्य रेल्वे घेणार 6 दिवसांचा मेगाब्लॉक, जाणून घ्या A टू Z माहिती एका क्लिकवर

Published : Jul 24, 2024, 02:50 PM ISTUpdated : Jul 24, 2024, 02:51 PM IST
Central Railway Jumbo Mega Block

सार

Central Railway Jumbo Mega Block : मध्य रेल्वेकडून घेण्यात आलेल्या या सहा दिवसांचा मेगाब्लॉक फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसणार आहे. यामुळे प्रवाशांचे मेगाहाल होण्याची शक्यता आहे.

Central Railway Jumbo Mega Block : सध्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेचे तीन तेरा वाजल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता मध्य रेल्वे सहा दिवसांचा मेगाब्लॉक घेणार आहे. यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या 19 गाड्या रद्द केल्या जाणार आहेत. तर 22 एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग बदलले जाणार आहेत. यामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मेगा हाल होणार आहेत.

27 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान असणार मेगाब्लॉक

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सहा दिवसाचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. दौंड रेल्वे स्थानकावरील विविध कामासाठी हा ब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक 27 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान असणार आहे. या काळात अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग बदलले जाणार आहेत.

पुणे विभागातील 19 गाड्या रद्द तर 22 एक्सप्रेसचे बदलले मार्ग

मध्य रेल्वेच्या या सहा दिवसांच्या ब्लॉकमुळे पुणे विभागातील 19 गाड्या रद्द करण्यात येतील. तर 22 एक्सप्रेस गाड्यांचे मार्गही बदलले जातील. यादरम्यान सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस 3 दिवसांसाठी रद्द करण्यात येणार आहे. ही ट्रेन 3 दिवस रद्द केल्याने प्रवाशांची तारांबळ उडणार आहे.

सोलापूर रेल्वे विभागातून काही गाड्यांचे बदलले मार्ग

त्यासोबत सोलापूर रेल्वे विभागातून काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते विशाखापट्टणम एक्स्प्रेस ही गाडी 29 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान पुर्ण-मिरज-कुर्डुवाडी मार्गे रवाना होईल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बंगळुरू एक्स्प्रेस ही गाडी ब्लॉक काळात पुणे-मिरज-कुर्डूवाडी मार्गे रवाना केली जाईल. त्यासोबतच बंगळुरु – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस 27 ते 31 जुलैपर्यंत कुडुवाडी-मिरज-पुणे मार्गे वळवली जाईल.

लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही फटका

नागरकोयल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस ही गाडी 28 जुलै रोजी गुंतकल-बल्लारी-हुबळी-मिरज-पुणे मार्गे रवाना होईल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागरकोयल ही गाडी 29 जुलै रोजी पुणे-मिरज-हुबळी-बल्लारी-गुंतकल मार्गे आणि चेन्नई – एकतानगर एक्स्प्रेस ही गाडी 28 जुलै रोजी गुंतकल- बल्लारी- हुबळी- मिरज-पुणे मार्गे धावणार आहे. मध्य रेल्वेकडून घेण्यात आलेल्या या सहा दिवसांचा मेगाब्लॉक फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसणार आहे. तसेच यामुळे प्रवाशांचे मेगाहाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आणखी वाचा : 

IAS पूजा खेडकरला मदत करणाऱ्या डॉक्टर, असिस्टंटला शिक्षा होणार का?

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

नववर्षात कोकण-गोवा ट्रिप प्लॅन केलीय? रेल्वेची मोठी घोषणा, या मार्गांवर धावणार खास गाड्या वेळापत्रक जाणून घ्या
तिकीट बुक करा! मराठवाड्यासाठी रेल्वेच्या ३ स्पेशल गाड्या सुरू; कुठून-कधी सुटणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर!