Tukaram Beej Dehu bus service: तुकाराम बीजेसाठी देहू नगरी सज्ज! भाविकांच्या सोयीसाठी धावणार १२५ जादा पीएमपीएमएल बस

Published : Mar 04, 2026, 03:45 PM IST

Tukaram Beej Dehu bus service: संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त देहूमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता, PMPML ने ४ ते ६ मार्च दरम्यान १२५ हून अधिक जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला. पुणे आणि आळंदीतून देहूसाठी या विशेष बसेस नियमित तिकीट दरात धावणार आहे.

PREV
14
तुकाराम बीजेसाठी देहू नगरी सज्ज!

पुणे : संतशिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या तुकाराम बीज सोहळ्यासाठी देहू नगरीत भक्तीचा सागर लोटणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या वारकऱ्यांची आणि भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) कंबर कसली आहे. ४ ते ६ मार्च या काळात तब्बल १२५ हून अधिक जादा बस सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे, या विशेष सेवेसाठी भाविकांना जादा पैसे मोजावे लागणार नसून, नियमित तिकीट दरातच हा प्रवास करता येईल.

24
असे असेल जादा बसचे नियोजन

भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पीएमपीने तारखेनुसार गाड्यांचे वेळापत्रक आखले आहे.

४ मार्च: स्वारगेट, मनपा भवन, पुणे स्टेशन आणि आळंदी येथून ३५ जादा बस सकाळ आणि दुपारच्या सत्रात धावतील.

५ मार्च (मुख्य सोहळा): या दिवशी सर्वाधिक गर्दी असल्याने २०७ विशेष बस नियोजित आहेत. यामध्ये स्वारगेट, मनपा, निगडी, पुणे स्टेशन, देहूरोड आणि आळंदी या मुख्य स्थानकांचा समावेश आहे.

६ मार्च: परतीच्या प्रवासासाठी स्वारगेट, पुणे स्टेशन, आळंदी आणि मनपा येथून ४९ बस उपलब्ध असतील.

34
देहू-आळंदी प्रवासासाठी विशेष सोय

अनेक भाविक देहूतील दर्शन घेऊन आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी जातात. ही गरज ओळखून ५ मार्च रोजी पुणे मनपा, पुणे स्टेशन आणि हडपसर येथून आळंदीसाठी १८ अतिरिक्त बस सोडल्या जाणार आहेत. 

44
प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना

तात्पुरते बस स्थानक: देहूगावातून परतण्यासाठी 'वैद्यकीय इंडे मळा' परिसरातील सैनिकी मैदानावर तात्पुरती बस व्यवस्था करण्यात आली आहे.

देहू-आळंदी कनेक्टिव्हिटी: या प्रवासासाठी संत तुकाराम महाराज क्रीडांगणाजवळील मोकळ्या जागेतून बस मार्गस्थ होतील.

प्रशासनाचे आवाहन: गर्दीच्या काळात शिस्त पाळावी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेऊन आपला प्रवास सुरक्षित करावा.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories