महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सरकार 'लाडकी बहीण योजने'अंतर्गत महिलांच्या खात्यात संक्रांतीपूर्वी पैसे जमा करण्याच्या तयारीत आहे. विरोधकांनी याला मतांसाठी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रकार म्हटले आहे.
लाडकी बहीण योजनेचे या तारखेला पैसे होणार जमा, संक्रांत गोड होणार
लाडक्या बहिणींना सरकारकडून पैसे मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी होण्यासाठी प्रयत्न सुरु केले असल्याचं दिसून आलं आहे.
25
सरकार लोकांची दिशाभूल करतंय
सरकार लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप आता विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला केंद्रस्थानी ठेवून प्रचार होत असल्याचा दावा केला जातोय.
35
महापालिका निवडणुकीसाठी कधी होणार मतदान?
महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. महायुतीकडून १४ जानेवारीच्या आधी मतदारांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येतील असा दावा करण्यात येत आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर संक्रांतीच्या आधी जमा करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या पैसे वाटपामुळे कोणावर संक्रांत येईल हे आताच सांगता येणार नाही.
55
कोण किती जागांवर लढणार?
महानगपालिकेत प्रत्येक पक्षाने त्यांचे उमेदवार उभे केले आहेत. यावेळी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुणे महापालिकेत एकमेकांसमोर किमान ११७ जागांवर लढत आहे.