Golden Modak: नाशिकमध्ये बाप्पासाठी 'सोन्याचा मोदक', किंमत ऐकून व्हाल थक्क!

vivek panmand   | CMS
Published : Sep 14, 2026, 09:53 PM IST
Golden Modak: नाशिकमध्ये बाप्पासाठी 'सोन्याचा मोदक', किंमत ऐकून व्हाल थक्क!

सार

गणेश चतुर्थीच्या उत्साहात नाशिकमधील एका मिठाईच्या दुकानाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या दुकानात तब्बल २७,००० रुपये किलो दराने 'गोल्डन मोदक' विकला जात आहे. सोन्याचा वर्ख असलेला हा मोदक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तर दुसरीकडे, कोलकात्यातील एका प्रसिद्ध दुकानाने बाप्पासाठी चक्क १,१०० किलोचा महाकाय मोदक तयार केला आहे.

नाशिक: गणेश चतुर्थीचा सण सुरू झालाय आणि देशभरातील मिठाईची दुकानं बाप्पाच्या प्रसादासाठी खास पदार्थ बनवत आहेत. पण या सगळ्यात नाशिकच्या एका दुकानाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. इथे चक्क २७,००० रुपये किलो दराने 'गोल्डन मोदक' विकला जात आहे. नाशिकच्या विद्या विकास सर्कलजवळ असलेल्या 'सागर स्वीट्स'ने खाण्यायोग्य सोन्याचा वर्ख (edible gold) लावलेले हे मोदक बाजारात आणले आहेत. याशिवाय, या दुकानात काजू, ड्राय फ्रूट, ऑरेंज आणि मलाई अशा २५ पेक्षा जास्त प्रकारचे मोदकही उपलब्ध आहेत. हे सोन्याचे मोदक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून, ग्राहक ते खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत आणि शहरात याचीच चर्चा सुरू आहे.

गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात, असं मानलं जातं. त्यामुळे गणेश चतुर्थी या सणात मोदकांना विशेष महत्त्व आहे. पण यावर्षी या पारंपरिक मिठाईला सोन्याचा मुलामा देऊन एक वेगळाच थाट देण्यात आला आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या कोलकात्यातील 'बलराम मल्लिक अँड राधारमण मल्लिक' या प्रसिद्ध मिठाईच्या दुकानाने यावर्षी बाप्पासाठी तब्बल १,१०० किलोचा एक महाकाय मोदक तयार केला आहे. त्यामुळे तिथेही उत्सवाला एक वेगळीच रंगत आली आहे.

गणेश चतुर्थी उत्सव कसा साजरा होतो?

आज देशभरात लाखो भाविक गणेश चतुर्थीचा सण साजरा करत आहेत. विघ्नहर्ता गणेशाचा हा जन्मदिवस. महाराष्ट्रात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा होतोच, पण आता कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्येही तो मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला आहे.

या उत्सवाची सुरुवात गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणून किंवा सार्वजनिक मंडळात स्थापित करून होते. त्यानंतर प्राणप्रतिष्ठा करून मूर्तीमध्ये देवत्व आणले जाते. मग दररोज आरती आणि पूजा केली जाते.

काही दिवसांनी विसर्जनाने या उत्सवाची सांगता होते. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढून बाप्पाच्या मूर्तीचं जवळच्या नदी किंवा तलावात विधीपूर्वक विसर्जन केलं जातं.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Pune Crime : निगडीत मंदिरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मेट्रो कामगार अटकेत
Tukaram Mundhe : शाळेत वडापाव पुन्हा सुरू करा! चिमुकल्याच्या प्रश्नावर तुकाराम मुंढेंनी दिलं भन्नाट उत्तर