Municipal Corporation Election 2026 : कोल्हापूर महापालिका निवडणूकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 48 उमेदवारांना संधी

Published : Dec 27, 2025, 08:53 AM IST
Municipal Corporation Election 2026

सार

Municipal Corporation Election 2026 : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून 48 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. या यादीत अनुभवी माजी नगरसेवकांसह नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. 

Municipal Corporation Election 2026 : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून उमेदवार निवडीवरून सर्वच पक्षांत हालचाल दिसत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी जागावाटपाचा तिढा कायम असतानाच काँग्रेसने आघाडी घेत कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसकडून तब्बल 48 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून यात अनेक अनुभवी माजी नगरसेवकांचा समावेश आहे.

काँग्रेसची पहिली यादी जाहीर

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिली उमेदवार यादी जाहीर करून राजकीय वातावरण तापवले आहे. या यादीत 48 उमेदवारांना संधी देण्यात आली असून राजेश लाटकर यांच्यासह अनेक दिग्गज माजी नगरसेवक पुन्हा मैदानात उतरणार आहेत. लवकर यादी जाहीर करून संघटन मजबूत ठेवण्याचा आणि बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात असल्याचे दिसत आहे.

राज्य निवड मंडळाच्या बैठकीत निर्णय

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य निवड मंडळाची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला खासदार शाहू छत्रपती महाराज, विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील यांची उपस्थिती होती. आमदार जयंत आसगांवकर, माजी आमदार मालोजीराजी छत्रपती आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांची निवड करण्यात आली.

अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांचा समतोल

काँग्रेसच्या पहिल्या यादीत अनुभवी माजी नगरसेवकांसह नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. विविध प्रभागांमध्ये आरक्षणाचा विचार करून महिला, मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसने सामाजिक समतोल साधत निवडणुकीत उतरण्याची रणनीती आखल्याचे स्पष्ट होते.

पुढील राजकीय हालचालींकडे लक्ष

काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीतील इतर पक्ष काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उर्वरित जागांवरील उमेदवारांची नावे कधी जाहीर होतात आणि युतीच्या चर्चेला कोणते वळण मिळते, हे आगामी दिवसांत स्पष्ट होणार आहे.

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

नवविवाहितेची बंगळुरुत तर पती-सासूचा नागपुरात आत्महत्येचा प्रयत्न, तरुणाचा मृत्यू तर सासू रुग्णालयात!
Maharashtra : अजित पवार अचानक नॉट रिचेबल! बारामती हॉस्टेलमधून कोणालाही न सांगता रवाना, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण