विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग, स्कॅनिंग मशीनमधील शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; जीवितहानी टळली

Published : May 19, 2025, 04:12 PM IST
mumbai vidhanbhavan fire

सार

मुंबईतील विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्कॅनिंग मशीनमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि अग्निशमन दलाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. ही घटना सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहे.

मुंबई: महाराष्ट्राच्या राजधानीतून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आज दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, स्कॅनिंग मशीनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली असल्याचं समोर आलं आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी प्रसंगावधान राखून काही मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवलं. घटनेमुळे काही काळ परिसरात धुराचे लोट पसरले होते, त्यामुळे खबरदारी म्हणून परिसर तात्पुरता रिकामा करण्यात आला होता.

विशेष म्हणजे, या घटनेच्या वेळी विधानभवनात महत्त्वाचा कार्यक्रम सुरू होता. विविध समित्यांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष आणि सर्वच आमदार उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर जेव्हा उपस्थित सर्वजण भोजनासाठी विधानभवनात दाखल झाले, त्याच दरम्यान ही घटना घडली.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले, “विधानभवनाच्या स्वागत कक्षाजवळील स्कॅनिंग मशीनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली. सुदैवाने आगीचं स्वरूप खूपच किरकोळ होतं आणि तात्काळ नियंत्रण मिळवलं गेलं. कोणालाही इजा झाली नाही, ही बाब दिलासादायक आहे.”

ही आग जरी मोठी नसली, तरी सुरक्षेच्या दृष्टीने ही एक गंभीर बाब मानली जात आहे. विधानभवनासारख्या उच्चस्तरीय सुरक्षायंत्रणांमध्ये असा प्रकार घडणे, हा प्रशासनासाठी सतर्कतेचा इशारा आहे. यापुढील काळात सुरक्षा उपाययोजनांमध्ये अधिक बळकटी आणण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!