Mumbai-Pune Expressway Toll Update: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सलग ३ दिवस 'टोल माफी'! पण प्रवासापूर्वी 'हे' एक पत्र सोबत ठेवा; पाहा संपूर्ण नियम

Published : Mar 24, 2026, 05:34 PM IST

Mumbai-Pune Expressway Toll Update: आई एकविरा देवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सलग तीन दिवस टोल माफी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड भागातून येणाऱ्या भाविकांना या सवलतीचा लाभ घेता येईल.

PREV
14
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सलग ३ दिवस 'टोल माफी'! पण प्रवासापूर्वी 'हे' एक पत्र सोबत ठेवा

Mumbai-Pune Expressway Toll Update: जर तुम्ही पुढच्या तीन दिवसांत मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास करणार असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. लोणावळ्यातील कार्ला गडावर होणाऱ्या आई एकविरा देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाच्या निमित्ताने भाविकांना टोलमधून मोठी सूट जाहीर करण्यात आली आहे. 

24
कधीपर्यंत असणार ही सवलत?

आई एकविरा देवीची ही भव्य यात्रा आज (मंगळवार) पासून सुरू होऊन बुधवार आणि गुरुवार असे सलग तीन दिवस चालणार आहे. या काळात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड परिसरातून लाखो भाविक आपल्या खाजगी वाहनांनी दर्शनासाठी येतात. या भाविकांना टोलचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागू नये, यासाठी ही विशेष सवलत देण्यात आली आहे. 

34
टोल माफी हवीये? तर 'हे' डॉक्युमेंट विसरू नका!

लक्षात ठेवा, ही टोल माफी सरसकट सर्व प्रवाशांसाठी नाही. भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाला असून, त्याचा लाभ घेण्यासाठी खालील नियम पाळावे लागतील:

अधिकृत पत्र अनिवार्य: टोल नाक्यावर सवलत मिळवण्यासाठी प्रवाशांकडे खासदार सुरेश म्हात्रे यांचे 'अधिकृत टोल माफी पत्र' असणे आवश्यक आहे.

तपासणी: टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना हे पत्र दाखवल्यानंतरच तुमच्या वाहनाला मोफत प्रवेश दिला जाईल.

हेतू: यात्रेकरूंची वाढती गर्दी पाहता, टोलनाक्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळणे आणि भाविकांना दिलासा देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. 

44
प्रवाशांसाठी सूचना

यात्रेनिमित्त एक्सप्रेसवेवर वाहनांची मोठी वर्दळ असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी आपले नियोजन करताना अधिकृत पत्राची प्रत सोबत ठेवावी, जेणेकरून प्रवासात कोणताही अडथळा येणार नाही.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories