
Mahavitaran Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) राज्यातील सर्वात मोठी वीज वितरण संस्था येथे नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. घराघरात वीज पोहोचवणाऱ्या महावितरण कंपनीने पदवीधर तरुणांसाठी विविध पदांवर 300 जागांची मोठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असून ही भरती विशेषतः तांत्रिक आणि व्यवस्थापकीय कौशल्य असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी मानली जात आहे.
महावितरणकडून जाहीर केलेल्या या भरतीमध्ये अनेक वरिष्ठ पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांना कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून थेट अर्ज करता येणार आहे.
भरतीमध्ये समाविष्ट पदे
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (DIST.)
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil)
उपकार्यकारी अभियंता (DIST.)
उपकार्यकारी अभियंता (Civil)
वरिष्ठ व्यवस्थापक (F&A)
व्यवस्थापक (F&A)
उपव्यवस्थापक (F&A)
एकूण 300 जागांसाठी ही भरती केली जात आहे.
पद वयोमर्यादा
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (DIST./Civil) 18 – 40 वर्षे
वरिष्ठ व्यवस्थापक (F&A), व्यवस्थापक (F&A) 18 – 40 वर्षे
उपकार्यकारी अभियंता (DIST./Civil) 18 – 35 वर्षे
उपव्यवस्थापक (F&A) 18 – 35 वर्षे
मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांची सवलत देण्यात आली आहे.
इतर कोणत्याही प्रवर्गाला अतिरिक्त सूट नाही.
1) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (DIST.)
B.E./B.Tech (Electrical)
किमान 7 वर्षांचा अनुभव
2) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil)
B.E./B.Tech (Civil)
7 वर्षांचा अनुभव
3) उपकार्यकारी अभियंता (DIST.)
B.E./B.Tech (Electrical)
3 वर्षांचा अनुभव
4) उपकार्यकारी अभियंता (Civil)
B.E./B.Tech (Civil)
3 वर्षांचा अनुभव
5) वरिष्ठ व्यवस्थापक (F&A)
CA / ICWA / CMA
7 वर्षांचा अनुभव
6) व्यवस्थापक (F&A)
CA / ICWA / CMA
3 वर्षांचा अनुभव
7) उपव्यवस्थापक (F&A)
CA / ICWA / CMA / M.Com / B.Com + MBA
1 वर्षाचा अनुभव
ऑनलाईन अर्ज लिंक - https://ibpsonline.ibps.in/msedcljun25/
महावितरण अधिकृत वेबसाइट - https://www.mahadiscom.in/
खुला प्रवर्ग: ₹500 + GST
राखीव प्रवर्ग: ₹250 + GST
अपंग उमेदवार: शुल्कातून पूर्ण सूट
टीप: एकदा भरलेले शुल्क परत मिळणार नाही.
महावितरणची निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल:
चाचणी किंवा मुलाखत
गुणवत्ता / पात्रतेनुसार अंतिम निवड
कागदपत्रांची पडताळणी
यशस्वी उमेदवारांची नेमणूक महाराष्ट्रातील कोणत्याही महावितरण विभागामध्ये करण्यात येईल.
या पदांसाठी वेतनश्रेणी उच्च असून, अनुभवी पदांसाठी दीड लाख रुपये पर्यंत पगार मिळू शकतो. तांत्रिक व वित्तीय क्षेत्रातील पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.