Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट! उद्या २४ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

Published : Mar 17, 2026, 10:12 PM IST

Maharashtra Weather Alert: IMD ने राज्यातील २४ जिल्ह्यांत १८ मार्चला अवकाळी पावसाचा 'यलो अलर्ट' जारी केला. वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. 

PREV
17
महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट! उद्या २४ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'

मुंबई: मार्च महिन्याच्या सुरुवातीला उन्हाच्या झळा सोसणाऱ्या महाराष्ट्राल आता निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसणार आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, उद्या १८ मार्च रोजी राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह हा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. 

27
तुमच्या विभागात हवामान कसे असेल?

१. कोकण: उकाडा आणि पावसाची शक्यता

मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये हवामान उष्ण आणि दमट राहील. मात्र, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत आर्द्रता जास्त असल्याने उकाडा अधिक जाणवेल, तर कमाल तापमान ३६°C पर्यंत जाण्याची शक्यता आहे. 

37
२. पश्चिम महाराष्ट्र: सोसाट्याचा वारा

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

47
३. उत्तर महाराष्ट्र आणि खान्देश

नाशिक, धुळे आणि जळगावमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे, तर अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्याला अवकाळीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिकमध्ये किमान तापमान १९ ते २२ अंशांच्या दरम्यान राहील. 

57
४. मराठवाडा: सर्वच जिल्ह्यांत पावसाचे सावट

छत्रपती संभाजीनगरसह नांदेड, परभणी, धाराशिव, हिंगोली, बीड आणि लातूर या सर्वच जिल्ह्यांमध्ये बुधवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

67
५. विदर्भ: वादळी पावसाचा तडाखा

नागपूरसह वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा आणि वर्धा या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळेल. विदर्भात कमाल तापमान ३८°C पर्यंत गेल्याने पावसाचा जोर अधिक असू शकतो. 

77
शेतकरी आणि नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना

शेतकरी बांधवांनी: कापणीला आलेली पिके आणि साठवून ठेवलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा.

नागरिकांनी: विजा चमकत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबणे टाळावे. बदलत्या हवामानामुळे आरोग्याची (सर्दी-खोकला) काळजी घ्यावी.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories