मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्याचे शरद पवारांनी म्हटले. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाची किंमत मिळत नसल्याचे सांगत त्यांनी जोरदार टीका केली आहे.
Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सांगितले होते. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार पक्ष) प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केले. शेतकऱ्याला त्याच्या घामाची किंमत देण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची असल्याचे शरद पवार म्हणाले. सत्तेचा उपयोग शेतकऱ्यांसाठी, तरुणांना रोजगार देण्यासाठी केला जात नसल्याचे शरद पवार म्हणाले. नवीन कारखाने झाले पाहिजेत, रोजगार वाढले पाहिजेत असे शरद पवार म्हणाले. त्यामुळे सरकर बदलण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले.
शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे ओझं कमी केले पाहिजे : शरद पवार
शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे ओझं कमी केले पाहिजे. आम्ही 80 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्याचा उल्लेख शरद पवार यांनी केला. तसेच आमचे सरकार असताना शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाचा विचार करुन आम्ही शेतमालाला दर दिल्याचे शरद पवार म्हणाले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभेचे नूतन खासदार धैर्यशील भैय्या मोहिते पाटील, कर्जत जामखेडचे आमदार रोहीत पवार यांच्या उपस्थितीत शरद शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी शरद पवार बोलत होते. अधिक उत्पन्न झाल्यानंतर शेतकऱ्यांचा शेतमाल जगाच्या बाजारपेठेत जाईल कसा याचा आम्ही विचार केल्याचे शरद पवार म्हणाले. फळबागसारखी योजना आमच्या सरकारने आणळी होती. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाल्याचे शरद पवार म्हणाले. आज मोदींचे राज्य आहे. अनेक राज्यात त्यांची सत्ता आहे. या सत्तेचा वापर शेतकऱ्यांसाठी केला जात नसल्याचे म्हणत शरद पवार यांनी सरकारवर टीका केली.
लोकसभेला तुम्ही जादू दाखवली
यावेळी लोकसभेला तुम्ही जादू दाखवली. जे लोक सांगत होते, 400 पार त्यांना 300 पर्यंत देखील देखील जाता आले नाही. सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना दुसऱ्यांची मदत घ्यावी लागली असे शरद पवार म्हणाले. ओमराजेंना 50000 पेक्षा मतांचा लीड बार्शी तालुक्याने खासदार ओमरांजेंना दिला आहे, त्याबद्दल तुमचे आभार असल्याचे शरद पवार म्हणाले.
बार्शी तालुका हा डाळ, तूर या सर्वांच्या व्यवहारासाठी प्रसिद्ध असल्याचे शरद पवार म्हणाले. एक काळ असा होता या भागात कापूस यायचा. येथील कापड गिरण्या प्रसिद्ध होत्या असेही शरद पवार म्हणाले. या तालुक्याने अनेक नेतृत्व देण्याचे काम केले असल्याचे पवार म्हणाले.
आणखी वाचा :
पीएम मोदींनी शेतकऱ्यांना 109 नवीन पीक वाण दिले भेट, सेंद्रिय शेतीवर केली चर्चा