Maharashtra weather update: राज्यात आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार, 32 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Published : Jun 16, 2024, 10:24 AM IST
tamilnadu rain

सार

Maharashtra weather update: बहुतांश राज्यात आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडणार आहे. 32 जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. 

Maharashtra weather update: राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी लागत असून आज बहुतांश राज्यात वादळीवाऱ्यांसह मुसळधार राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील 32 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात असून उर्वरित भागात हलक्या व मध्यम सरींची शक्यता आहे.

मागील काही दिवस राज्यातील काही भागांना पावसाने ओढ दिल्याचे चित्र दिसून आले. परंतु आता मान्सून तळ कोकणापासून मध्य महाराष्ट्र विदर्भ व मराठवाड्यातही पुढे सरकला असून राज्यभर ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून बीड, जालनासह धाराशिव, लातूर, नांदेड, परभणीतही जोरदार पाऊस झाला.

आज राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असून 32 जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. यावेळी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणार असून वाऱ्याचा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रति तास राहणार आहे. राज्यात पुढील तीन दिवस ही जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील कोंडीला ब्रेक, मीरा-भाईंदरमध्ये नवे वाहतूक नियोजन; 15 डिसेंबरपासून अंमलबजावणी
महाराष्ट्राला गतिमानता! पुणे-मुंबई दीड तासात, संभाजीनगरसाठी नवा एक्स्प्रेसवे; नितीन गडकरींची मोठी घोषणा