महाराष्ट्रात 'महायुती'चा झंझावात! नगरपरिषद निवडणुकीत भाजपची बाजी, मविआचा सुपडा साफ; पाहा २८८ नगराध्यक्षांची संपूर्ण यादी

Published : Dec 21, 2025, 11:23 PM IST
mahavikas aaghadi and mahayuti

सार

महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने, विशेषतः भाजपने, मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपने १२९ नगराध्यक्ष पदांसह ३ हजारांहून अधिक जागा जिंकल्या, तर महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा 'देवेंद्र' नीतीचा करिश्मा पाहायला मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने विजयाची 'त्सुनामी' आणली आहे. राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीने विरोधकांचा पार धुव्वा उडवला असून, भाजप राज्यामध्ये पुन्हा एकदा 'नंबर वन'चा पक्ष ठरला आहे.

'देवाभाऊ'च ठरले धुरंधर!

लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, आधी विधानसभा आणि आता नगरपरिषद निवडणुकीत घवघवीत यश मिळवून फडणवीस यांनी आपणच महाराष्ट्राच्या राजकारणाचे खरे 'चाणक्य' आहोत, हे सिद्ध केले आहे. या निवडणुकीत भाजपचे तब्बल ३ हजारांहून अधिक नगरसेवक आणि १२९ नगराध्यक्ष निवडून आले आहेत.

पक्षनिहाय कोणाला किती जागा?

महायुतीने एकजुटीने लढत देत २०० हून अधिक जागांवर कब्जा केला आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजपसह एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही जोरदार कामगिरी केली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीची मात्र या निवडणुकीत पार 'धुळधाण' उडाली आहे.

भारतीय जनता पक्ष: १२९ जागा

शिवसेना (शिंदे गट): ५१ जागा

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): ३३ जागा

काँग्रेस: ३५ जागा

शिवसेना (ठाकरे गट): ०८ जागा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): ०८ जागा

पाहा तुमच्या शहरातील नवे 'नगराध्यक्ष' (जिल्हानिहाय यादी)

अ.क्र. जिल्हा नगरपरिषद / नगरपंचायतीचे नाव विजयी उमेदवारांचे नाव पक्ष

1 पालघर डहाणू राजेंद्र माच्छी (शिंदे गट) शिवसेना

2 पालघर जव्हार पुजा उदान भाजप

3 पालघर पालघर उत्तम भरत शिवसेना

4 पालघर वाडा रिमा कंधे भाजप

5 रायगड अलिबाग अक्षया नाईक शेकाप

6 रायगड कर्जत पुष्पा दगडे परिवर्त आघाडी

7 रायगड खोपोली कुलदीपक शेंडे शिवसेना

8 रायगड महाड सुनिल कविस्कर शिवसेना

9 रायगड माथेरान चंद्रकांत चौधरी शिवसेना

10 रायगड मुरुड-जंजिरा आराधना दांडेकर राष्ट्रवादी

11 रायगड पेण प्रीतम पाटील भाजप

12 रायगड रोहा वनश्री शेडगे राष्ट्रवादी

13 रायगड श्रीवर्धन अतुल चोगले उबाठा

14 रायगड उरण भावना घाणेकर राष्ट्रवादी शरद पवार

15 रत्नागिरी चिपळूण उमेश सकपाळ शिवसेना

16 रत्नागिरी देवरुख मृणाल शेट्ये भाजप

17 रत्नागिरी गुहागर निता मालप भाजप

18 रत्नागिरी खेड माधवी बुटाला शिवसेना

19 रत्नागिरी लांजा सावली कुरुप शिवसेना

20 रत्नागिरी राजापूर हु्स्नबानू खलिपे काँग्रेस

21 रत्नागिरी रत्नागिरी शिल्पा सुर्वे शिवसेना

22 सिंधुदूर्ग कणकवली संदेश पारकर शहर विकास आघाडी

23 सिंधुदूर्ग मालवण ममता वराडकर शिवसेना

24 सिंधुदूर्ग सावंतवाडी श्रद्धाराजे भोसले भाजप

25 सिंधुदूर्ग वेंगुर्ला राजन सिरन भाजप

26 ठाणे अंबरनाथ तेजश्री करंजुले भाजप

27 ठाणे कुळगाव-बदलापूर ऋचिता घोरपडे भाजप

28 अहिल्यानगर देवळाली प्रवरा सत्यजित कदम भाजप

29 अहिल्यानगर जामखेड प्रांजल चिंतामणी भाजप

30 अहिल्यानगर कोपरगाव पराग संधान भाजप

31 अहिल्यानगर नेवासा डॉ. करण घुले भाजप

32 अहिल्यानगर पाथर्डी अभय आव्हाड भाजप

33 अहिल्यानगर राहाता स्वाधीन गाडेकर भाजप

34 अहिल्यानगर राहूरी बाबासाहेब मोरे अपक्ष

35 अहिल्यानगर संगमनेर मैथीली तांबे अपक्ष

36 अहिल्यानगर शेवगाव माया मुंडे शिवसेना

37 अहिल्यानगर शिर्डी जयश्री विष्णू थोरात भाजप

38 अहिल्यानगर श्रीगोंदा सुनिता भाजप

39 अहिल्यानगर श्रीरामपूर करण ससाणे (आघाडी) काँग्रेस

40 धुळे दोंडाईचा-वरवाडे नयनकुमार रावल भाजप

41 धुळे पिंपळनेर डॉ.योगिता चौरे भाजप

42 धुळे सिंदखेडा कलावती माळी काँग्रेस

43 धुळे शिरपूर-वरवाडे चिंतणभाई पटेल भाजप

44 जळगाव जामनेर साधना महाजन भाजप

45 जळगाव अमळनेर परीक्षित बाविस्कर शिवसेना

46 जळगाव भडगाव रेखा मालचे शिवसेना

47 जळगाव भूसावळ रजनी सावकारे (आघाडीवर) राष्ट्रवादी

48 जळगाव चाळीसगाव प्रतिभा चव्हाण भाजप

49 जळगाव चोपडा नम्रता पाटील शिवसेना

50 जळगाव धरणगांव लीलाबाई चौधरी उबाठा

51 जळगाव एरंणडोल डॉक्टर नरेंद्र पाटील शिवसेना

52 जळगाव फैजपूर दामिनी सराफ भाजप

53 जळगाव मुक्ताईनगर संजना चंद्रकांत पाटील शिवसेना

54 जळगाव नशिराबाद योगेश पाटील भाजप

55 जळगाव पाचोरा सुनीता किशोर पाटील शिवसेना

56 जळगाव परोळा चंद्रकांत पाटील शिवसेना

57 जळगाव रावेर संगीता महाजन भाजप

58 जळगाव सावदा रेणुका पाटील भाजप

59 जळगाव शेंदूर्णी गोविंदा अग्रवाल भाजप

60 जळगाव वरणगांव सुनील काळे भाजप बंडखोर

61 जळगाव यावल छाया पाटील उबाठा

62 नंदूरबार शहादा अभिजित पांडे अपक्ष

63 नंदूरबार नंदूरबार रत्ना रघुवंशी शिवसेना

64 नंदूरबार नवापूर जयवंत जाधव राष्ट्रवादी

65 नंदूरबार तळोदा भाग्यश्री चौधरी शिवसेना

66 नाशिक भगुर प्रेरणा बलकवडे राष्ट्रवादी काँग्रेस

67 नाशिक मनमाड बबलू पाटील शिवसेना

68 नाशिक नांदगाव सागर हिरे राष्ट्रवादी

69 नाशिक सटाणा हर्षदा पाटील शिवसेना

70 नाशिक सिन्नर विट्ठलराजे उगले राष्ट्रवादी

71 नाशिक येवला राजेंद्र लोणारी राष्ट्रवादी

72 नाशिक चांदवाड वैभव बागुल भाजप

73 नाशिक इगतपूरी शालिनी खताळे शिवसेना

74 नाशिक ओझर अनिता घेगडमल भाजप

75 नाशिक पिंपळगांव बसवंत डॉ. मनोज बर्डे भाजप

76 नाशिक त्र्यंबक त्रिवेणी तुंगार शिवसेना

77 कोल्हापूर आजरा अशोक चराटी भाजप

78 कोल्हापूर चंदगड सुनिल काणेकर भाजप

79 कोल्हापूर गडहिंग्लज महेश महादेव तुरबतमठ राष्ट्रवादी

80 कोल्हापूर हातकणंगले अजितसिंह पाटील (शिवसेना शिंदे गट) शिवसेना

81 कोल्हापूर हुपरी मंगलराव माळगे भाजप

82 कोल्हापूर जयसिंगपूर संजय पाटील शिवसेना

83 कोल्हापूर कागल सविता माने राष्ट्रवादी

84 कोल्हापूर कुरुंदवाड मनीषा डांगे शिवसेना

85 कोल्हापूर मलकापूर रश्मी कोठवळे अपक्ष

86 कोल्हापूर मुरगूड प्रवीणसिंह पाटील शिवसेना

87 कोल्हापूर पन्हाळा जयश्री पवार अन्य

88 कोल्हापूर शिरोळ योगिता कांबळे काँग्रेस

89 कोल्हापूर वडगाव (कोल्हापूर) विद्या पोळ काँग्रेस

90 पुणे आळंदी प्रशांत कुराडे भाजप

91 पुणे बारामती सचिन सातव राष्ट्रवादी

92 पुणे भोर रामचंद्र आवारे राष्ट्रवादी

93 पुणे चाकण मनीषा गोरे शिवसेना

94 पुणे दौंड दुर्गादेवी जगदाळे राष्ट्रवादी

95 पुणे फुरसुंगी-उरळी देवाची संतोष सरोदे राष्ट्रवादी

96 पुणे इंदापूर भरत शाह राष्ट्रवादी

97 पुणे जेजूरी जयदीप बारभाई राष्ट्रवादी

98 पुणे जुन्नर सुजाता काजळे शिवसेना

99 पुणे लोणावळा राजेंद्र सोनवणे राष्ट्रवादी

100 पुणे मालेगाव बु. सुयोग सातपुते राष्ट्रवादी

101 पुणे मंचर राजश्री गांजले शिवसेना

102 पुणे राजगुरुनगर मंगेश गुंडा शिवसेना

103 पुणे सासवड आनंदी जगताप भाजप

104 पुणे शिरूर ऐश्वर्या पाचरणे राष्ट्रवादी

105 पुणे तळेगाव-दाभाडे संतोष दाभाडे भाजप

106 पुणे वडगाव (पुणे) आंबोली ढोरे राष्ट्रवादी

107 सांगली आष्टा विशाल शिंदे राष्ट्रवादी शरद पवार

108 सांगली आटपाडी उत्तमराव जाधव भाजप

109 सांगली इस्लामपूर आनंदराव मलगुंडे राष्ट्रवादी शरद पवार

110 सांगली जत डॉ. रवींद्र आरळी भाजप

111 सांगली पळूस संजीवनी पुदाले काँग्रेस

112 सांगली शिराळा पृथ्वीसिंग भगतसिंग नाईक शिवसेना

113 सांगली तासगाव विजया बाबासाहेब पाटील राष्ट्रवादी शरद पवार

114 सांगली विटा काजल म्हेत्रे शिवसेना

115 सातारा कराड राजेंद्रसिंह यादव शिवसेना

116 सातारा महाबळेश्वर सुनील शिंदे राष्ट्रवादी

117 सातारा मलकापूर सातारा तेजस शेखर सोनावले भाजप

118 सातारा मेढा रुपाली वारागडे भाजप

119 सातारा म्हसवड पूजा वीरकर भाजप

120 सातारा पाचगणी संजय जाधव राष्ट्रवादी

121 सातारा फलटण समशेरसिंह नाईक निंबाळकर भाजप

122 सातारा रहिमतपूर वैशाली माने भाजप

123 सातारा सातारा अमोल मोहिते भाजप

124 सातारा वाई अनिल सावंत भाजप

125 सोलापूर अक्कलकोट मिलन कल्याण शेट्टी भाजप

126 सोलापूर अकलूज रेश्मा आडगळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार

127 सोलापूर अनागर प्राजक्ता पाटील भाजप

128 सोलापूर बार्शी तेजस्विनी कथले (आघाडीवर) भाजप

129 सोलापूर दुधनी प्रथमेश शंकर मेत्रे शिवसेना

130 सोलापूर करमाळा मोहिनी संजय सावंत अपक्ष

131 सोलापूर कुरडूवाडी जयश्री भिसे उबाठा

132 सोलापूर मैंदर्गी अंजली बाजारमठ भाजप

133 सोलापूर मंगळवेढा सुनंदा बबनराव अपक्ष

134 सोलापूर मोहोळ सिद्धी वस्त्रे शिवसेना

135 सोलापूर पंढरपूर प्रणिती भालके (आघाडीवर) अपक्ष

136 सोलापूर सांगोला आनंदा माने शिवसेना

137 बीड अंबेजोगाई नंदकिशोर मुंदडा स्थानिक आघाडी

138 बीड बीड प्रेम लता पारवे राष्ट्रवादी काँग्रेस

139 बीड धारुर बाळासाहेब जाधव राष्ट्रवादी काँग्रेस

140 बीड गेवराई गीता पवार भाजप

141 बीड माजलगाव मेहरीन चाऊस राष्ट्रवादी शरद पवार

142 बीड परळी-वैजनाथ पद्मश्री धर्माधिकारी भाजप

143 छ. संभाजीनगर फुलंब्री राजेंद्र ठोंबरे उबाठा

144 छ. संभाजीनगर गंगापूर संजय जाधव राष्ट्रवादी

145 छ. संभाजीनगर कन्नड शेख फरीन बेगम काँग्रेस

146 छ. संभाजीनगर खुलताबाद अमीर पटेल काँग्रेस

147 छ. संभाजीनगर पैठण विद्या कावसानकर शिवसेना

148 छ. संभाजीनगर सिल्लोड समीर सत्तार शिवसेना

149 छ. संभाजीनगर वैजापूर दिनेश परदेशी भाजप

150 धाराशिव भूम संयोजिता गाढवे अपक्ष

151 धाराशिव कळंब सुनंदा शिवाजी कापसे शिवसेना

152 धाराशिव मुरुम बापूराव पाटील भाजप

153 धाराशिव नळदुर्ग बसवराज धरणे भाजप

154 धाराशिव धाराशिव नेहा काकडे भाजप

155 धाराशिव परंडा जाकीर सौदागर शिवसेना

156 धाराशिव तुळजापूर विनोद पिटु गंगणे भाजप

157 धाराशिव उमरगा किरण गायकवाड शिवसेना

158 हिंगोली बसमतनगर भाजप

159 हिंगोली हिंगोली रेखा बांगर शिवसेना

160 हिंगोली कळमनुरी आश्लेषा चौधरी शिवसेना

161 जालना अंबड देवयानी कुलकर्णी भाजप

162 जालना भोकरदन मिर्झा समरिन राष्ट्रवादी शरद पवार

163 जालना परतूर प्रियांका राक्षी भाजप

164 लातूर अहमदपूर स्वप्नील व्हत्ते भाजप

165 लातूर औसा शेख परवीन राष्ट्रवादी

166 लातूर निलंगा संजयराज हलगरकर भाजप

167 लातूर रेणापूर शोभा आकनगिरी भाजप

168 लातूर उदगीर स्वाती हुड्डे भाजप

169 नांदेड बिलोली संतोष कुलकर्णी अपक्ष

170 नांदेड देगलूर विजय माला टेकाडे राष्ट्रवादी

171 नांदेड धर्माबाद संगीता बोलमवार अपक्ष

172 नांदेड हदगाव रोहिणी वानखेडे शिवसेना

173 नांदेड हिमायतनगर शेख रसिक काँग्रेस

174 नांदेड कंधार शहाजी नळगे काँग्रेस

175 नांदेड कुंडलवाडी प्रेरणा कोटलवार भाजप

176 नांदेड मुदखेड विश्रांती कदम भाजप

177 नांदेड मुखेड बालाजी खतगावकर शिवसेना

178 नांदेड उमरी शकुंतला मुदीराज राष्ट्रवादी

179 नांदेड भोकर भगवान दंडवे भाजप

180 नांदेड किनवट सुजाता एड्रलवार उबाठा

181 नांदेड लोहा शरद पवार राष्ट्रवादी

182 परभणी गंगाखेड उर्मिला मधुसूदन केंद्रे राष्ट्रवादी

183 परभणी जिंतूर प्रताप विनायक देशमुख भाजप

184 परभणी मानवत राणी अंकुश लाड राष्ट्रवादी

185 परभणी पाथरी आसेफ खान शिवसेना

186 परभणी पूर्णा विमलबाई लक्ष्मराव कदम स्थानिक आघाडी/यशवंत सेना

187 परभणी सेलू मिलिंद सावंत भाजप

188 परभणी सोनपेठ परमेश्वर राजाभाऊ कदम स्थानिक आघाडी/यशवंत सेना

189 अकोला अकोट माया धुळे भाजप

190 अकोला बाळापूर अर्फिम परबिंद मोहम्मद जमीर काँग्रेस

191 अकोला बार्शी-टाकळी अफ्तर खातून अलिम उद्दिन वंंचित

192 अकोला हिवरखेडा सुलभा दुतोंडे भाजप

193 अकोला मुर्तीजापूर हर्षल साबळे भाजप

194 अकोला तेल्हारा वैशाली पालीवाल भाजप

195 अमरावती अचलपूर रूपाली माथने भाजप

196 अमरावती अंजनगाव सुर्जी अविनाश गायगोले भाजप

197 अमरावती चांदूरबाजार मनीषा नांगलिया प्रहार

198 अमरावती चांदूर रेल्वे प्रियंका विश्वकर्मा वंचित

199 अमरावती चिखलदरा अब्दुल शेख हैदर काँँग्रेस

200 अमरावती दर्यापूर मंदा भारसाकडे काँग्रेस

201 अमरावती धामणगांव रेल्वे अर्चना अडसड रोठे भाजप

202 अमरावती धरणी सुनील चौथमल भाजप

203 अमरावती मोर्शी प्रतीक्षा गुल्हाने शिवसेना

204 अमरावती नंद-खांदेश्वर प्राप्ती मारोडकर उबाठा

205 अमरावती शेंदूरजनाघाट सुवर्णा वरकरे भाजप

206 अमरावती वरुड ईश्वर सलामे भाजप

207 बुलढाणा बुलढाणा पूजा संजय गायकवाड शिवसेना

208 बुलढाणा चिखली पंडित देशमुख भाजप

209 बुलढाणा देऊळगाव राजा माधुरी शिंपणे राष्ट्रवादी

210 बुलढाणा जळगाव जामोद गणेश दांडगे भाजप

211 बुलढाणा खामगाव अर्पण फुंडकर भाजप

212 बुलढाणा लोणार मिरा मापारी काँग्रेस

213 बुलढाणा मलकापूर (बुलढाणा) आतिक जवारी वाले काँग्रेस

214 बुलढाणा मेहकर किशोर गारोडे उबाठा

215 बुलढाणा नांदूरा मंगला मुऱ्हेकर भाजप

216 बुलढाणा शेगाव प्रकाश शेगोकार काँग्रेस

217 बुलढाणा सिंदखेडराजा सौरभ तायडे राष्ट्रवादी शरद पवार

218 वाशिम कारंजा फरीदा बानो अहमद शफी पुंजानी वंचित

219 वाशिम मालेगाव ओम खुरसडे शिवसेना

220 वाशिम मंगरुळपीर अशोक परळीकर राष्ट्रवादी

221 वाशिम रिसोड भगवंतवर क्षिरसागर भाजप

222 वाशिम वाशिम अनिल केंदळे भाजप

223 यवतमाळ आर्णी नालंदा भरणे काँग्रेस

224 यवतमाळ दारव्हा सुनील चिरडे शिवसेना

225 यवतमाळ दिग्रस पुजा राऊत शिवसेना

226 यवतमाळ घाटंजी परेश कारिया काँग्रेस

227 यवतमाळ पुसद मोहिनी नाईक राष्ट्रवादी

228 यवतमाळ उमरखेड तेजश्री जैन अपक्ष

229 यवतमाळ वणी विद्या आत्राम (भाजप) - आघाडी भाजप

230 यवतमाळ यवतमाळ प्रियदर्शिनी उईके भाजप

231 यवतमाळ ढाणकी अर्चना वासमवार उबाठा

232 यवतमाळ नेर-नबाबपूर सुनिता जयस्वाल शिवसेना

233 यवतमाळ पांढरकवडा आतिश बोरले भाजप

234 भंडारा पवनी डॉ. विजया नांदुरकर राष्ट्रवादी

235 भंडारा साकोली शेंदूरवाफा देवश्री कापगते भाजप

236 भंडारा तुमसर सागर गभणे अपक्ष

237 भंडारा भंडारा मधुरा मदनकर भाजप

238 चंद्रपूर बल्लारपूर अलका वाढई काँग्रेस

239 चंद्रपूर भद्रावती प्रफुल्ल चटकी शिवसेना

240 चंद्रपूर भिसी अतुल पारवे भाजप

241 चंद्रपूर ब्रह्मपूरी योगेश मिसार काँग्रेस

242 चंद्रपूर चिमूर गीता लिंगायत भाजप

243 चंद्रपूर गडचांदूर निलेश ताजने अपक्ष

244 चंद्रपूर घुग्घुस दिप्ती सोनटक्के काँग्रेस

245 चंद्रपूर मूल एकता समर्थ काँग्रेस

246 चंद्रपूर नागभीड स्मिता खापर्डे काँग्रेस

247 चंद्रपूर राजुरा अरुण धोटे काँग्रेस

248 चंद्रपूर वरोरा अर्चना ठाकरे काँग्रेस

249 गडचिरोली आरमोरी रुपेश पुणेकर भाजप

250 गडचिरोली देसाईगंज लता सुंदरकर भाजप

251 गडचिरोली गडचिरोली प्रणोती निभोंरकर भाजप

252 गोंदीया गोंदिया सचिन शेंडे काँग्रेस

253 गोंदीया गोरेगाव तेजराम बिसने काँग्रेस

254 गोंदीया सालेकसा विजय फुंडे काँग्रेस

255 गोंदीया तिरोडा अशोक असाटी भाजप

256 नागपूर बहादूरा प्रतीक्षा खंडारे भाजप

257 नागपूर बेसा पिपळा कीर्ती बडोले भाजप

258 नागपूर भिवापूर सुषमा शिरामे भाजप

259 नागपूर बुटीबोरी सुमित मेंढे काँग्रेस

260 नागपूर डिगडोह पूजा उके भाजप

261 नागपूर कळमेश्वर-ब्रह्मणी अविनाश माकोडे भाजप

262 नागपूर कामठी अजय अग्रवाल भाजप

263 नागपूर कांद्री-कन्हान सुजित पानतावणे भाजप

264 नागपूर काटोल अर्चना देशमुख अपक्ष

265 नागपूर खापा पियुष बोरडे भाजप

266 नागपूर कोंढाळी योगेश चाफले भाजप

267 नागपूर महादुळा हेमलता ठाकूर(सावजी) भाजप

268 नागपूर मोहपा माधव चर्जन काँग्रेस

269 नागपूर मौदा प्रसन्न तिडके भाजप

270 नागपूर नरखेड मनोज कोरडे भाजप

271 नागपूर निल-डोह भूमिका मंडपे भाजप

272 नागपूर पारशिवणी सुनीता डोमकी शिवसेना

273 नागपूर रामटेक बिकेंद्र महाजन शिवसेना

274 नागपूर सावनेर संजना मंगळे भाजप

275 नागपूर उमरेड प्राजक्ता कारू भाजप

276 नागपूर वानाडोंगरी सुनंदा बागडे भाजप

277 नागपूर बिडगाव-तरोडी (खु) पांढुर्णा विरु जामगडे भाजप

278 नागपूर गोधणी(रेल्वे) रोशना कोलते भाजप

279 नागपूर कन्हान-पिपरी नराजेंद्र शेंद्रे भाजप

280 नागपूर मोवाड दर्शना ढोरे भाजप

281 नागपूर वाडी नरेश चरडे भाजप

282 नागपूर येरखेडा राजकिरण बर्वे भाजप

283 वर्धा आर्वी स्वाती गुल्हाने भाजप

284 वर्धा देवळी किरण ठाकरे काँग्रेस

285 वर्धा हिंगणघाट नयना तुळस्कर अपक्ष

286 वर्धा पुलगाव कविता ब्राह्मणकर काँग्रेस

287 वर्धा सिंदी रेल्वे राणी स्नेहल कलोडे भाजप

288 वर्धा वर्धा सुधीर पांगुळ काँग्रेस

मविआचा सुपडा साफ!

या निवडणुकीत ठाकरे गट आणि शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अनेक ठिकाणी या पक्षांना उमेदवारही उभे करता आले नाहीत, तर जिथे उभे केले तिथे त्यांची प्रचंड धुळधाण उडाली. काँग्रेसने काही ठिकाणी प्रतिकार केला असला तरी महायुतीच्या त्सुनामीपुढे त्यांचा निभाव लागला नाही.

थोडक्यात सांगायचे तर, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ग्रामीण आणि निमशहरी भागात आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. 'लाडकी बहीण' योजना आणि विकासकामांचा महायुतीला मोठा फायदा झाल्याचे या निकालांवरून स्पष्ट होत आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Ladki Bahin Yojana : नगर परिषद निकालाचा गुलाल उधळताच एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी!
Pune Metro : पुणे मेट्रो प्रवाशांसाठी मोठी बातमी! स्थानकांची नवी नावे जाहीर; तुमच्या स्टेशनचे नाव काय?