Mukhyamantri mazi Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, सरकारचा आला नवा जीआर

Published : Jul 13, 2024, 01:59 PM IST
CM Ladki Bahin Yojna

सार

Mukhyamantri mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा आता हजारो महिलांना फायदा होणार आहे.

Mukhyamantri mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात अर्ज करत आहेत. पण हा अर्ज करताना महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. याच अडचणी कमी व्हाव्यात यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. 13 जुलै रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. माझी लाडकी बहीण योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. याच निर्णयात लाईव्ह फोटोसंदर्भात मोठा बदल करण्यात आला आहे.

फोटोचा फोटो काढता येणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे आणि सुलभतेने व्हावी याबाबत या योजनेच्या अटीत आता नव्याने सुधारणा करण्यात आल्या आहेत. या योजनेसाठी महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने फॉर्म भरण्याची सोय करून देण्यात आली आहे. महिला नारीशक्ती, पोर्टल या वेगवेगळ्या माध्यमातून हा अर्ज करू शकतात. याआधी महिलांना अर्ज करताना आपला लाईव्ह फोटो द्यावा लागायचा. पण आता नव्या निर्णयाअंतर्गत तशी गरज भासणार नाही.

 

 

नव्या शासन निर्णयात नेमके काय आहे?

नव्या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरणे सोपे व्हावे यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाअंतर्गत आता योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजेच आता महिलांना फॉर्म भरताना आता स्वत:चा लाईव्ह फोटो देण्याची गरज नाही.

31 ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज करता येणार

महिलांना 31 ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत. जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहिना 1500 रुपये देण्यात येणार आहेत. ही योजना फक्त आगामी निवडणुकीपुरती राबवण्यात येत आहे, असा दावा विरोधकांकडून केला जात होता. पण ही योजना आगामी काळातही चालूच राहील. ती निवडणुकीनंतर बंद केली जाणार नाही, असे स्पष्टीकरण राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात दिले होते.

आणखी वाचा :

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : महिलांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Mumbai Heavy Rain News : पुढील 36 तासात मुंबईत 200 मिमी पाऊस पडणार, हवामान विभागाने दिला इशारा

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

तिकीट बुक करा! मराठवाड्यासाठी रेल्वेच्या ३ स्पेशल गाड्या सुरू; कुठून-कधी सुटणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर!
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!