Maharashtra Election Result 2024: ‘त्या’ दिवशी आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार

Published : Nov 21, 2024, 11:23 AM IST
Sanjay Raut

सार

शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मविआ सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. एक्झिट पोलला फ्रॉड म्हणत त्यांनी मविआला १६०-१६५ जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ पार पडली असून आता निवडणुकीच्या मतमोजणीची वाट पाहिली जात आहे. यावेळी महाविकास आघाडी की महायुती यामध्ये कोण जिंकणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली असून महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचं म्हटलं आहे. 

संजय राऊत काय म्हणाले? - 

एक्झिट पोल हा एक फ्रॉड आहे. हरियाणामध्ये काँग्रेस ६० च्या वर जागा येईल पण काय झाले आपण पाहिले. लोकसभेला ४०० पार पण काय झाले आपण पाहिलं. लोकांनी मतदान केले ते गुप्त असतं काही लोक गोंधळ वाढवण्याचा प्रयत्व करतात. मविआ. २६ तारखेला संध्याकाळ पर्यंत आम्ही सत्ता स्थापन करण्याचा दावा करू शकतो. मविआला १६०-१६५ जागा एकत्रित निवडून येत आहे. त्यामुळे एक्झिट पोल वरती कोणीही विश्वास ठेवू नये.आम्ही २३ तारखेला ही सत्तेवर दावा करू, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

पैशापेक्षा महाराष्ट्राचा स्वाभिमान महत्वाचा -

सत्तेचा चाव्या येतात की फक्त कुलूप येणार 72 तासाने ठरेल. प्रचंड पैसे आणि यंत्रणा गैर वापर केला आहे. पैशापेक्षा महत्वाचा महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान आहे. जनतेने महाराष्ट्रासाठी मतदान केले. आमचं स्पष्ट होते की महारष्ट्र की अदानी हवा आहे. ट्रम्प प्रशासनाने अदानी विरुद्ध अटक वॉरंट काढले आहे. 250 मिलियम डॉलरचा भ्रष्टाचार आहे, असं राऊत पुढं बोलताना म्हटलं आहे. 

PREV

Recommended Stories

ZP-Panchayat Samiti Election : ग्रामीण भागातील राजकारणाचं रणशिंग फुंकलं! १२ जिल्हा परिषदा अन् १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर; 'या' दिवशी मतदान!
आता 10 मिनिटांत डिलिव्हरी बंद, Blinkit Swiggy Zomato Zepto ने सेवा थांबवली