Maharashtra Election 2024: जरांगे यांनी 'या' उमेदवारांना पाडण्याचे दिले आदेश?

Published : Nov 14, 2024, 03:57 PM IST
manoj jarange patil

सार

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन आघाड्यांमध्ये लढत होत आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी या निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करता पाडून टाका असेच आदेश दिले आहेत. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडायचे आहे असं त्यांनी सांगितलं आहे. 

मनोज जरांगे काय म्हणाले? - 
विधानसभा निवडणुकीत मी मराठ्यांना हेच सांगितले आहे की, ज्यांना पडायचे त्याला पाडा, ज्यांना निवडून आणायचे त्यांना निवडून आणा. मी माझ्या वाक्यावर पहिल्यापासून ठाम आहे, आजही कायम राहणार आहे, आणि उद्याही राहणार आहे. राज्यभरातील मराठा समाज माझ्या ऐकण्यात आहे. मी जर म्हणालो यालाच मतदान करा, तर त्याचा अर्थ मी जात विकली असा होतो किंवा दावणीला बांधली असा होतो. पण मी माझ्या समाजाला कुणाच्याही दावणीला कसा बांधेल? असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. 

कोणालाच पाठींबा देणार नाही - 
 कोणालाच पाठींबा देणार नाही असं यावेळी मनोज जरांगे जरांगे यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे महाराष्ट्रातील कोणत्या उमेदवारांना पाठींबा देतात याकडे समाजाचे लक्ष लागले होते पण त्यांनी कोणालाही पाठनबा दिलेला नाही. 

PREV

Recommended Stories

मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील कोंडीला ब्रेक, मीरा-भाईंदरमध्ये नवे वाहतूक नियोजन; 15 डिसेंबरपासून अंमलबजावणी
महाराष्ट्राला गतिमानता! पुणे-मुंबई दीड तासात, संभाजीनगरसाठी नवा एक्स्प्रेसवे; नितीन गडकरींची मोठी घोषणा