
Maharashtra : माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना’ सध्या बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षण विभागातील ‘स्वच्छता मॉनिटर’, ‘एक राज्य एक गणवेश’, आणि ‘पुस्तकाला वह्यांची पाने’ यांसारखे उपक्रम आधीच स्थगित झाले होते. या शैक्षणिक वर्षात (2024-25) नोव्हेंबर महिना सुरू असूनही ही योजना अद्याप राबवली गेलेली नाही.
राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास, आधुनिकीकरण आणि सौंदर्यीकरण करण्याच्या उद्देशाने ही योजना ५ डिसेंबर २०२३ रोजी सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत राज्यभर शाळांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरावर पारितोषिकांचे वितरण करण्यात आले होते. दोन टप्प्यांमध्ये ही योजना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली होती. मात्र, यंदा या योजनेला कोणतीही गती मिळालेली नाही. याशिवाय दानवे म्हणाले की, “या योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे. निवडणुकांपूर्वीचा भंपकपणा आम्ही जनतेसमोर उघड करू.”
शिंदे सरकारच्या आणखी एका योजनेच्या बंदीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. एक्स (X) वर पोस्ट करत त्यांनी लिहिले की, “सामान्यांना थोडाफार लाभ देणाऱ्या योजना बंद करून फडणवीस सरकारने आपल्या सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या आहेत. अमच्यातून गेलेले ‘कटप्रमुख’ मात्र यावर मौन बाळगून बुलेट ट्रेनचं गुणगान करत आहेत.”
अंबादास दानवेंनी सरकारकडे निर्देश करत काही योजनांची यादीही दिली –