'देशात जाती जनगणना करा', छगन भुजबळांची मोठी मागणी

समता परिषदेच्या आज झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

 

Rameshwar Gavhane | Published : Jun 17, 2024 11:52 AM IST / Updated: Jun 17 2024, 05:25 PM IST

देशात जातीनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. तसेच ही जनगणना झाली तर याचा देशातील ओबीसींना मोठा फायदा होईल आणि त्यांना केंद्रातून मोठ्या प्रमाणात निधी मिळेल, असेही ते म्हणाले. आज झालेल्या समता परिषदेच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आहेत. आता आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार आहोत की त्यांनी जातीनिहाय जनगणना करावी. ती केली तर ओबीसींच्या विविध मुद्द्यांवर प्रकाश पडेल. नुसतीच लोकसंख्या समजणार नाही तर ओबीसींची परिस्थिती देखील आपल्याला समजेल. त्यामुळे केंद्र सरकारकडून मिळणारा निधी, जो आता केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना मिळतोय तो ओबीसींना देखील मिळू शकतो, परंतु, त्यासाठी जनगणना व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

आपण केवळ राज्यापूर्ती जनगणना करून फायदा होणार नाही. त्याने केवळ आपल्याला माहिती मिळते. परंतु, केंद्राचा निधी मिळत नाही. केंद्राकडून निधी कशाप्रकारे मिळवता येईल याबाबत समता परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली, असेही त्यांनी सांगितले.

आणखी वाचा :

Maharashtra Assembly Election 2024: मविआचा विधानसभेचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?, काँग्रेस 100, ठाकरे गट 95, शरद पवार गटाला 85 जागा?

 

Share this article