उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशा, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Published : May 12, 2024, 12:52 PM IST
Chandrashekhar Bawankule

सार

उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली असून ही मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशाच असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाला लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी लोकशाही, संविधान, शिवसेनेतील बंड, राज्यातील उद्योगधंदे दुसऱ्या राज्यात जाणं अशा अनेक मुद्यांवर भाष्य केलं आहे. आता या मुलाखतीवरुन राज्याचे राजकारण तापले असून अनेक आरोप-प्रत्यारोप सध्या केले जात आहे. यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत थेट आव्हानच दिले आहे.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली. ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. यावेळी बोलताना बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान देत पाच प्रश्न उपस्थित केले. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांचीही उत्तरं द्यावीत, महाराष्ट्रातील जनता या उत्तरांची वाट पाहत आहे, असे खुले आव्हानच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स वर एका पोस्टच्या माध्यमातून केले आहे.

 

 

उद्धव ठाकरे यांनी खालील प्रश्नांची उत्तरं द्यावीत

1. दहशतवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय?

2. ⁠१९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता?, हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला लाज वाटली नाही का?

3. ⁠सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे. त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात?

4. ⁠ राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेलेचपाटे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याबद्दल तुम्ही गप्प का आहात?

5. ⁠उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून का बसला होता?

उद्धव ठाकरेंनी एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांचीही उत्तरं द्यावीत, महाराष्ट्रातील जनता या उत्तरांची वाट पाहत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणले. आता उद्धव ठाकरे हे आव्हान स्वीकारतात का आणि बावनकुळे यांच्या टीकेला कशा पद्धतीने उत्तर देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

नववर्षात कोकण-गोवा ट्रिप प्लॅन केलीय? रेल्वेची मोठी घोषणा, या मार्गांवर धावणार खास गाड्या वेळापत्रक जाणून घ्या
तिकीट बुक करा! मराठवाड्यासाठी रेल्वेच्या ३ स्पेशल गाड्या सुरू; कुठून-कधी सुटणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर!