Unseasonal Rain Crop Damage Help: बळीराजाला मोठा दिलासा! अवकाळीच्या नुकसानीनंतर राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; तातडीने पंचनाम्यांचे आदेश

Published : Apr 07, 2026, 05:14 PM IST
Unseasonal Rain Crop Damage Help

सार

Unseasonal Rain Crop Damage Help: राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर, राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. 

मुंबई: राज्यातील विविध जिल्ह्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले असतानाच, राज्य सरकारने मदतीसाठी मोठा पुढाकार घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी नुकसानीचा आढावा घेत प्रशासनाला थेट फिल्डवर उतरण्याचे आदेश दिले आहेत.

प्रशासनाला 'डेडलाईन'; तातडीने होणार पंचनामे

बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, मदतीसाठी कागदी घोडे नाचवण्यापेक्षा प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन पिकांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. "शेतकऱ्यांच्या पदरात लवकरात लवकर मदत पडेल याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, यात कोणताही विलंब खपवून घेतला जाणार नाही," असे सज्जड दमही त्यांनी दिला आहे.

एनडीआरएफ (NDRF) च्या निकषांनुसार भरपाई

अवकाळी पावसामुळे पिचलेल्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी केंद्र सरकारच्या NDRF निकषांनुसार आर्थिक मदत दिली जाणार आहे. यामध्ये नुकसानीच्या तीव्रतेनुसार मदत निधीचे वाटप थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात करण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे.

फळबागायतदारांना मोठा फटका; विशेष मदतीची शक्यता

प्राथमिक अहवालानुसार, या अवकाळीचा सर्वाधिक तडाखा आंबा, द्राक्षे आणि डाळिंबाच्या बागांना बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. म्हणूनच, फळबागांच्या नुकसानीसाठी विशेष लक्ष देऊन मदत देण्याच्या सूचना मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आल्या आहेत.

पुन्हा उभं राहण्यासाठी मदतीचा हात

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. अशा वेळी सरकारने घेतलेला हा तातडीचा निर्णय शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी पुन्हा उभे राहण्यासाठी बळ देणारा ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

MahaBCOW: बांधकाम कामगारांनो, आता सरकार देतंय मोफत संसार संच! १७ प्रकारच्या भांड्यांमध्ये काय-काय मिळणार? जाणून घ्या
युद्धाचा भडका आणि खतांचा तुटवडा! खरीप हंगामापूर्वीच बळीराजाच्या चिंतेत भर; काय आहे नेमकं संकट?