सचिन वाझेच्या आरोपांवर अनिल देशमुखांचा पलटवार, 'वाझे विश्वास ठेवण्यालायक नाही'

Published : Aug 03, 2024, 11:34 AM ISTUpdated : Aug 03, 2024, 11:44 AM IST
Anil Deshmukh On Sachin Waze

सार

सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांना देशमुखांनी उत्तर दिले आहे. देशमुखांनी वाझे यांना गुन्हेगार ठरवत त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही असे म्हटले आहे.

Anil Deshmukh On Sachin Waze : मुंबई पोलीस दलातून निलंबीत केलेले अधिकारी सचिन वाझे याने महाराष्ट्राच्या राजकारण ढवळून निघेल असा बॉम्ब टाकला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझे याने गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझेने आरोप केल्यानंतर तासाभरातच अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेत सचिन वाझेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच सचिन वाझे हा गुन्हेगार आहे. ही व्यक्ती विश्वास ठेवण्यालायक नाही असं हायकोर्टाने म्हटल्याचा दाखला देखील त्यांनी यावेळी बोलताना दिला आहे. ते नागपुरात बोलत होते.

नेमकं काय म्हणालेत अनिल देशमुख?

अनिल देशमुख यांनी सांगितले की, सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. मुंबई उच्च न्यायालयाने देखील वाझेबद्दल बोलताना वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे, असे म्हटले होते. दोन खुनाचा त्यांच्यावर गुन्हा आहे. त्यामुळे सचिन वाझेच्या वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असं देखील हायकोर्ट म्हणाले होते. सचिन वाझे याला हाताशी धरुन फडणवीस माझ्यावर आरोप करत आहेत.

अनिल देशमुख यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

सचिन वाझेच्या आरोपानंतर अनिल देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. अनिल देशमुख यांनी सांगितले की, चार पाच दिवसांपूर्वी मी फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी कशा पद्धतीने प्रतिज्ञापत्र पाठवले होते. मी केलेल्या त्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे याला हाताशी धरुन माझ्यावर आरोप केला आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांना मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटले ते माहीत नाही का? (सचिन वाझे) गुन्हेगारी स्वरुपाची पार्श्वभूमी आहे. यामुळे त्याच्या वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. परंतु त्याला हाताशी धरुन माझ्यावर आरोप लावत आहे.

नेमकं काय म्हणाले होते सचिन वाझे?

सचिन वाझेंनी म्हटलं की, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. सीबीआयकडे देखील त्याचे पुरावे आहेत. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. सुनावणी त्यांच्या विरोधात गेली आहे. देवेंद्र फडणवीसांना देखील या संदर्भात मी पत्र लिहिले आहे. मी नार्को टेस्टसाठी कधीही तयार आहे. मी एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये जयंत पाटील यांचे नाव आहे.

आणखी वाचा :

सचिन वाझे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट, वसुली प्रकरणात जयंत पाटील यांचे घेतलं नाव

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!