सचिन वाझे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट, वसुली प्रकरणात जयंत पाटील यांचे घेतलं नाव

Published : Aug 03, 2024, 11:19 AM ISTUpdated : Aug 03, 2024, 11:45 AM IST
Jayant Patil

सार

सचिन वाझे यांनी वसुली प्रकरणात जयंत पाटील यांचे नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे. पत्रात त्यांनी अनिल देशमुखांवर देखील गंभीर आरोप केले आहेत आणि पुरावे असल्याचे म्हटले आहे.

Sachin Waze On Jayant Patil : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आता महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघेल अशी खळबळजनक बातमी समोर येत आहे. मुंबईचे निलंबीत पोलीस अधिकारी आणि 100 कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक गौप्यस्फोट केलाय. वसुली प्रकरणात सचिन वाझेंने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचे नाव घेतले आहे.

सचिन वाझेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र

वसुली प्रकरणात तुरुंगात असलेल्या सचिन वाझेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहे. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप केला. तसेच या प्रकरणातील पुरावे देखील त्यांनी फडणवीसांना दिले आहे. फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात वाझेंनी जयंत पाटलांचे देखील नाव असल्याचा दावा केला आहे. वसुली प्रकरणात जयंत पाटील यांचे नाव समोर आल्याने राज्याच्या राजकरणात मोठी खळबळ उडाली आहे.

जयंत पाटील यांच्यावर नेमके आरोप काय?

सचिन वाझेंनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात नेमके काय लिहिले या संदर्भातील सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या पत्रात सचिन वाझेंनी प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. या पत्रातच अनिल देशमुखांबरोबरच जयंत पाटलांवर देखील आरोप केले आहेत. पत्रातील माहिती समोर आल्यानंतर जयंत पाटलांवर नेमके काय आरोप केले यासंदर्भातील माहिती समोर येईल.

सचिन वाझे यांनी केलेले गौप्यस्फोट

फडणवीसांना दिलेल्या पत्रात मी जयंत पाटलांचेही नाव लिहिले आहे असे म्हटले आहे.

अनिल देशमुखांना पी ए मार्फत पैसे दिले जात होते.

मी जे बोलतोय, त्याचे सारे पुरावे आहेत,ते सीबीआयकडेही पुरावे आहेत.

फडणवीसांना लिहलेल्या पत्रात मी सारे पुरावे दिले आहेत.

माझी नार्को करा, मी नार्को टेस्टसाठी तयार आहे.

नेमकं काय म्हणाले सचिन वाझे?

“जे काही घडलं आहे त्याचे सर्व पुरावे आहेत. ते (अनिल देशमुख) त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. याबाबत ‘सीबीआय’कडेही पुरावे आहेत. मी देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिलं आहे. हे सर्व प्रकरण (अनिल देशमुख) त्यांच्या विरोधात गेलेलं आहे. तसेच मी या प्रकरणात नार्को टेस्ट करायलाही तयार आहे. मी एक लेटर लिहिलं आहे, त्यामध्ये जयंत पाटील यांचंही नाव आहे”, असे सचिन वाझेने म्हटलं आहे.

आणखी वाचा : 

सचिन वाझेच्या आरोपांवर अनिल देशमुखांचा पलटवार, 'वाझे विश्वास ठेवण्यालायक नाही'

 

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

भाविकांसाठी बंपर गिफ्ट! शिर्डी आणि तिरुपतीला जाणाऱ्यांसाठी आता साप्ताहिक स्पेशल रेल्वे; लगेच पाहा संपूर्ण वेळापत्रक!
Ration Card : दीड वर्षानंतर रेशनकार्ड धारकांना बंपर लॉटरी! 'या' वस्तूचा लाभ मिळणार, लगेच तपासा!