लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं मोठा निर्णय घेतला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. सातव्या टप्प्याचं मतदान पार पडत असताना सर्वांना लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे वेध लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (NCP SP) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी विश्वासू नेत्याची निवड केली आहे. पी.सी. चाको यांना राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून संधी देण्यात आलीय तर पक्षाच्या राष्ट्रीय महासचिवपदी राजीव झा यांना संधी देण्यात आली आहे.
शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी शरद पवारांनी पक्षात बदल केले आहेत. पीसी चाको यांना राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. तर, राष्ट्रीय महासचिव पदी राजीव झा यांना संधी देण्यात आली आहे.
कोण आहेत पी.सी. चाको?
पी.सी. चाको केरळच्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार राहिले आहेत. पी.सी. चाको यांनी 10 मार्च 2021 काँग्रेस पक्षातून राजीनामा दिला होता. युवक काँग्रेसचे केरळचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे. काँग्रेस पक्षात त्यांनी विविध पदांवर काम केलं होतं. 2021 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. केरळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील आहेत.
आणखी वाचा:
मी विजयी होणार, कार्यकर्त्यांनी रॅलीची तयारी केली; निकालाआधीच नारायण राणेंना कॉन्फिडन्स