Ladki Bahin Yojana E-KYC Update: पैसे अडकलेत? लाडक्या बहिणींना दिलासा; e-KYC दुरुस्तीसाठी पुन्हा संधी, ही आहे अंतिम तारीख

Published : Feb 07, 2026, 05:27 PM IST

Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे e-KYC मधील तांत्रिक त्रुटींमुळे अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. सरकारने आता या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

PREV
15
लाडक्या बहिणींनो, खात्यात पैसे आले नाहीत? टेन्शन सोडा!

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभासाठी अर्ज करूनही अनेक महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. मात्र आता अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी आहे. e-KYC पूर्ण करूनही तांत्रिक कारणांमुळे लाभ न मिळालेल्या महिलांना माहिती दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. सरकारने यासाठी ३१ मार्च २०२६ ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. 

25
E-KYC केलं, तरी पैसे का आले नाहीत?

योजनेसाठी अर्ज करताना अनेक महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र,

आधार कार्डवरील नाव आणि अर्जातील नाव जुळत नसणे

बँक खाते आधारशी लिंक नसणे

बायोमेट्रिक किंवा OTP संबंधित तांत्रिक त्रुटी

या कारणांमुळे हजारो महिलांचे पैसे DBT (Direct Benefit Transfer) द्वारे खात्यात जमा होऊ शकले नाहीत. महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे की, e-KYC मधील चुका दुरुस्त झाल्याशिवाय निधी हस्तांतरण शक्य नाही. 

35
३१ मार्च २०२६ पर्यंत दुरुस्तीची अंतिम संधी

ज्या महिलांना अद्याप लाभ मिळालेला नाही किंवा ज्यांच्या अर्जात त्रुटी आहेत, त्यांच्यासाठी सरकारने ऑनलाइन दुरुस्ती सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

महिला लाभार्थ्यांनी

जवळच्या CSC (नागरी सुविधा केंद्रात) जाऊन

किंवा

योजनेच्या अधिकृत पोर्टलवर स्वतः लॉगिन करून

आपली माहिती तपासून आवश्यक बदल करून घ्यावेत. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०२६ ही शेवटची तारीख आहे. 

45
प्रशासन काय म्हणतं?

“राज्यातील एकही पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, हीच शासनाची भूमिका आहे,” असे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे. केवळ तांत्रिक कारणांमुळे कोणाचाही हक्क हिरावला जाऊ नये, यासाठीच ही मुदतवाढ देण्यात आली आहे. 

55
लाभासाठी या गोष्टींची घ्या काळजी

आधार-बँक लिंक: तुमचे बँक खाते आधारशी सीडेड आहे का, ते तपासा

मोबाईल नंबर: आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर सक्रिय ठेवा

अर्ज स्टेटस: अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्जाची सद्यस्थिती तपासा

वेळीच e-KYC मधील त्रुटी दुरुस्त केल्यास पुढील हप्ते कोणत्याही अडथळ्याविना थेट खात्यात जमा होतील.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories