बायकोचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून भारतीय लष्कराच्या जवानाने उचलले टोकाचे पाऊल

Published : Jun 01, 2025, 09:16 PM ISTUpdated : Jun 01, 2025, 10:21 PM IST
major

सार

धुळ्यात एका लष्करी जवानाने पत्नीच्या कथित अनैतिक संबंधांच्या संशयावरून गळा दाबून खून केला. या घटनेमुळे सैनिकांच्या मानसिक आरोग्याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

धुळे - देशाच्या सीमांवर शत्रूंशी लढणारा एक सैनिक… पण स्वतःच्या घरात मात्र त्याने पत्नीसोबतच 'शेवटची लढाई' अमानवी पद्धतीनं लढल्याचे दिसून आलं आहे. धुळे जिल्ह्यात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र खळबळ उडवली आहे.

धुळे जिल्ह्यातील एका लष्करी जवानाने पत्नीच्या कथित परपुरुषासोबत संबंध असल्याच्या संशयातून तिला गळा दाबून ठार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. विवाहबाह्य संबंधांची कुणकुण लागल्यानंतर आपले मानसिक संतुलन गमावलेल्या जवानाने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

या जवानाने देशासाठी शस्त्र हातात घेतलं होतं, पण संशयाच्या विळख्यात अडकून त्याने प्रेम, संयम आणि समजूतदारपणाचा मार्ग सोडून हिंसेचा घातक निर्णय घेतला. त्याच्या हातून घडलेली ही घटना केवळ एक कौटुंबिक हत्याकांड नाही, तर ती मानसिक आरोग्य, संवाद आणि संवेदनशीलतेच्या अभावाचं भयावह चित्रही आहे.

या घटनेनंतर सैनिकी सेवेत असलेल्या जवानांच्या मानसिक आरोग्याबाबत नव्याने प्रश्न उपस्थित होतो आहे. कठोर शिस्त आणि तणावपूर्ण जीवनशैली असलेल्यांना 'भावनिक हलकल्लोळ' सहन करणं कठीण जातं. संशयाचे विष आणि संवादाचा अभाव असेल, तर त्याचा शेवट किती भीषण असू शकतो, याचं हे जिवंत उदाहरण ठरत आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक