
महाराष्ट्र: महाराष्ट्रासह मराठवाड्यात पाऊस अतिवृष्टी होऊन कोसळत आहे. नांदेड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. लोकांनी मोठ्या परिश्रमाने बांधलेली घरे डोळ्यापुढे कोसळताना अनेकांचे डोळे भरून आले होते. त्यांना त्यांच्या घराला वाहत जाताना पाहून अनेकांना प्रचंड दुःख झालं आहे.
नांदेड जिल्ह्यातील अनेक लोकांचे घर वाहून गेले आहेत. त्यांना परत एकदा संसार परत उभं करण्याची धडपड सुरु झाली आहे. या जिल्ह्यात जवळपास साडेतीनशेपेक्षा जास्त घर उध्वस्त झाली असल्याची माहिती समजली आहे. ज्या लोकांची घरे उध्वस्त झाली आहेत त्यांना निवारा स्थानावर शिफ्ट करण्यासाठी लगबग सुरु असल्याचं दिसून आलं आहे.
महिनाभर पडणारा पाऊस तीन दिवसांमध्ये पडला असून त्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणावर तारांबळ उडाल्याचे दिसून आलं आहे. तीन दिवसांमध्ये तब्बल ५०१ मिलीमीटर पावसाची नोंद हवामान खात्याच्या वतीने करण्यात आली. थोडक्यात एक महिन्यात पडणारा पाऊस हा तीन दिवसांमध्ये पडल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळं नागरिकांची धांदल उडाली.
आज हवामान विभागाच्या वतीने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये खासकरून रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे, या ठिकाणी फिरायला जाणाऱ्या पर्यटकांना काळजी घेण्याचं अवाहन करण्यात आला आहे. मुंबईमध्ये भिंत अंगावर कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. वाढत असलेल्या पावसामुळे बचाव यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्या आहेत. एखाद्या ठिकाणी दुर्घटना घडल्यास तातडीने बचाव पथकाला कॉल करून मदत बोलावण्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.