छत्रपती संभाजीनगर–परभणी रेल्वेचा 2179 कोटींचा मेगा प्लॅन मंजूर!, मराठवाड्याच्या विकासाला नवी गती

Published : Nov 16, 2025, 04:17 PM IST

Sambhajinagar Parbhani Railway Doubling Project: केंद्र सरकारने छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी २,१७९ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दिली. यामुळे मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार.

PREV
17
मराठवाड्याच्या विकासाला नवी गती येणार

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यासाठी ऐतिहासिक ठरणारा निर्णय केंद्र सरकारने अखेर मंजूर केला आहे. छत्रपती संभाजीनगर ते परभणी या महत्त्वाच्या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करण्याच्या बहुप्रतीक्षित प्रकल्पाला 2,179 कोटी रुपयांची मोठी मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांच्या विकासाला नवी चालना मिळणार आहे. येथील लोकांना छ. संभाजीनगरला जाणे सोपे होणार आहे. त्यांची आर्थिक बचतही होणार आहे. त्यामुळे लोकांचे जीवनमान उंचावल्याचे दिसून येईल.

27
2179 कोटींचा रेल्वे गेमचेंजर प्लॅन

दक्षिण मध्य रेल्वे विभागातील 177.79 किमी लांबीच्या या मार्गासाठी 1 ऑगस्ट 2025 रोजी केंद्राकडून निधी उपलब्ध करण्यात आला. त्यानंतर 21 ऑक्टोबर रोजी जमीन संपादनासाठी प्राथमिक अधिसूचना जारी झाली. जालना उपविभागातील शेतकऱ्यांकडून 21 नोव्हेंबरपर्यंत हरकती व आक्षेप मागवण्यात आले आहेत.

आता पुढील टप्प्यांत

ऐकणी

जमीन मोजणी

संपादन

मोबदला वितरण

निविदा प्रक्रिया

आणि काम सुरू होण्याचे आदेश जारी

ही संपूर्ण प्रक्रिया वेगाने पूर्ण होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

37
मनमाड–नांदेड दुहेरीकरणाचा मार्ग सुकर

या दुहेरीकरण प्रकल्पामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मनमाड–नांदेड रेल्वे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामांना चालना मिळेल. लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासनाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रकल्प प्राधान्य यादीत आला आणि आता प्रत्यक्ष कामाला गती मिळू लागली आहे. 

47
या गावांतील जमीन संपादित होणार

जालना तालुका – अंदाजे 20.26 हेक्टर जमीन

दरेगाव, हिस्वन बु., कारला, लोंढ्याची वाडी, माळीपिंपळगाव, ममदाबाद, पाचनवडगाव, रोहनवाडी, बदनापूर, दावलवाडी, मात्रेवाडी, रामखेडा, शेलगाव, वरुडी, गोकुळवाडी

परतूर उपविभाग – अंदाजे 7 हेक्टर जमीन

आनंदवाडी, परतूर, खांडवी, उस्मानपूर, रायपूर, सातोना खु., सिरसगाव, मसला या गावांतील जमिनी मार्गदुहेरीकरणासाठी संपादित केल्या जाणार असून, बाधितांना ठरावीक दराने मोबदला मिळणार आहे. 

57
दुहेरीकरणामुळे मिळणारे फायदे

संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील प्रवास अधिक जलद

मालवाहतुकीसाठी स्वतंत्र ट्रॅक- शेतमाल आणि औद्योगिक माल वाहतुकीला गती

उद्योगांसाठी सुवर्णसंधी- लॉजिस्टिक पार्क, कोल्ड स्टोरेज, गोदामे, नवे उद्योग

नागपूर–मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरला थेट फायदा 

67
जमीन मोजणीचा संयुक्त अहवाल मागवला

रेल्वे रुळाच्या लगत असणाऱ्या जमिनीची संयुक्त मोजणी करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यावर आधारित अंतिम अधिसूचना जारी केली जाईल. त्यानंतर जमिनीचे दर निश्चित होऊन बाधितांना मोबदला मिळेल. रेल्वे रुळालगतची मोजणी असल्याने प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी रामदास दौंड यांनी दिली.

77
मराठवाड्यासाठी विकासाचा नवा महामार्ग

या प्रकल्पामुळे केवळ रेल्वे वाहतुकीचाच नाही, तर संपूर्ण मराठवाड्याच्या औद्योगिक, कृषी आणि वाहतूक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार आहे. 2179 कोटींच्या या दुहेरीकरणामुळे प्रदेशाचा विकास अनेक पटीने वेगाने होण्याची अपेक्षा आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories