"सरसकट मराठा आरक्षण दिलं, तर दुसऱ्याच दिवशी कोर्टात खेचू!", छगन भुजबळ यांचा फडणवीसांना इशारा

Published : Sep 01, 2025, 07:22 PM IST
Devendra Fadnavis on Chhagan Bhujbal

सार

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सरकारला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची चेतावणी दिली आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाला त्यांनी विरोध दर्शवला असून, आरक्षणाची रचना कोलमडेल असा इशारा दिला. 

मुंबई : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने सरकारला चांगलंच अडचणीत आणलं असताना, ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सरकारसमोर थेट चेतावणीच दिली आहे. "सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्यास दुसऱ्याच दिवशी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार!" असा थेट इशारा त्यांनी दिला.

सोमवारी ओबीसी नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, भुजबळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आधीचे निकाल समोर ठेवले. या निकालांमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, "मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही, तर प्रगत आहे" आणि मराठा-कुणबी एकत्रीकरण शक्य नाही.

भुजबळ म्हणाले, "जर सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं, तर आरक्षणाची रचना कोलमडेल. आमचा लढा सुरूच राहील." यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.

जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावरील आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. त्यांची मागणी – संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करून आरक्षण देण्यात यावे – सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे.

भुजबळ यांचा ठाम विरोध, "ओबीसींच्या वाटपातील आरक्षण दुसऱ्याला देता कामा नये."

त्यांचा इशारा स्पष्ट होता "सरकारने जर असं पाऊल उचललं, तर आम्हीही मैदानावर उतरू, उपोषण करू, जिल्ह्याजिल्ह्यांतून मिरवणुका काढू, आणि लाखोंच्या संख्येने मुंबईत धडक देऊ." भुजबळ पुढे म्हणाले, "एखाद्या जातीला अमुक एका प्रवर्गात टाकणं, हे कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत नाही. मग ते फडणवीस असोत वा शरद पवार."

त्यांनी सरकारला सूचित केलं की आरक्षणासारखे संवेदनशील निर्णय कायद्याच्या चौकटीत घ्यावेत, अन्यथा तीव्र प्रतिक्रिया ओबीसी समाजाकडून येतील.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Nashik Accident News : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात भीषण अपघात; संरक्षण कठडा तोडून इनोव्हा दरीत कोसळली, पाच जण ठार असल्याची भीती
Adiwasi Land Rules: आदिवासींची जमीन खरेदी-विक्री करता येते का? कायदा नेमकं काय सांगतो? जाणून घ्या महत्वाची माहिती