भिवंडीत भाजपला खिंडार! ९ नगरसेवक बंडाच्या पवित्र्यात; काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत रचला सत्तेचा नवा 'सेक्युलर फ्रंट'

Published : Feb 19, 2026, 04:29 PM IST
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Eknath Shinde (Photo/ANI)

सार

Bhiwandi mayor election politics: भिवंडी महापौर निवडणुकीच्या पूर्वसंध्येला, भाजपमधील अंतर्गत कलहामुळे ९ नगरसेवकांनी बंडखोरी करत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गटाला पाठिंबा दिला आहे. 

भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीच्या पूर्वसंध्येला शहराच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवारीवरून सुरू झालेला अंतर्गत कलह आता थेट पक्षफुटीपर्यंत पोहोचला असून, भाजपचे ९ नगरसेवक चक्क काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले आहेत. या नाट्यमय घडामोडींमुळे उद्या २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर निवडणुकीत सत्ता समीकरणे पूर्णपणे उलटी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नेमकं काय घडलं? वादाची ठिणगी कशी पडली?

भिवंडी महापालिकेत महापौर पदासाठी चुरस असताना भाजपने सुरुवातीला नारायण चौधरी यांचे नाव निश्चित केले होते. मात्र, ऐनवेळी पक्षनेतृत्वाने बदल करत स्नेहा पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. या निर्णयामुळे नाराज झालेल्या नारायण चौधरी यांनी थेट बंडाचे निशाण फडकवले.

शिंदेंची भेट आणि काँग्रेसशी जवळीक: नाराज नगरसेवकांचा हा गट प्रथम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेला, मात्र त्यानंतर त्यांनी थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्थापन केलेल्या 'भिवंडी सेक्युलर फ्रंट'ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

नवा फॉर्म्युला: काँग्रेसने आता 'व्हिप' जारी करत आपल्या नगरसेवकांना महापौर पदासाठी नारायण चौधरी (भाजप बंडखोर) आणि उपमहापौर पदासाठी तारीक मोमीन (काँग्रेस) यांना मतदान करण्याचे आदेश दिले आहेत.

महापालिकेतील सध्याचे संख्याबळ

पक्ष नगरसेवक संख्या

काँग्रेस ३०

भाजप २२

शिवसेना/राष्ट्रवादी प्रत्येकी १२

इतर (SP, कोविआ, अपक्ष) १४

कायदेशीर पेच आणि अपात्रतेची टांगती तलवार

भाजपने आपल्या नगरसेवकांसाठी स्नेहा पाटील यांना मतदान करण्याचा 'व्हिप' जारी केला आहे. जर बंडखोर ९ नगरसेवकांनी काँग्रेसच्या गटात जाऊन मतदान केले, तर त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत अपात्रतेची कारवाई होऊ शकते. त्यांची नगरसेवक पदे धोक्यात येऊ शकतात, ज्यावर विभागीय आयुक्त अंतिम निर्णय घेतील.

पुढचे पाऊल काय?

बंडखोर नगरसेवक थोड्याच वेळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची 'टिळक भवन' येथे भेट घेणार आहेत. ते अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार की केवळ बाहेरून पाठिंबा देणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपने जर आपल्या या नाराज सदस्यांची समजूत काढली नाही, तर भिवंडीत कमळ कोमेजून काँग्रेसच्या समर्थनाने भाजप बंडखोराचा महापौर बसण्याची दाट शक्यता आहे.

 

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक