अकोल्यात पाच दिवसाआड होणार पाणीपुरवठा

उन्हामुळे धरणामधील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. त्यातच काटेपूर्णा धरणामध्ये केवळ १७.९० टक्के जलसाठा आहे. त्या पार्श्वभूमीवक

 

अकोला: जिल्ह्यात उन्हाचा पारा ४५ अंशाच्या पार गेला असून, राज्यात सार्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. वाढलेल्या तापमानामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये बाष्पीभवनामुळे जलसाठा कमी होत आहे. अकोलेकरांची तहान भागविणाऱ्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पामध्ये केवळ १७.९० टक्केच जलसाठा शिल्लक असल्याने महानगरपालिका प्रशासनाने अकोला शहरात चार दिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्यात एक दिवसाने वाढ करण्‍यात आली आहे. त्यामुळे आता सोमवार दि. २७ मे २०२४ पासून संपूर्ण शहराला पाच दिवसाआड पाणी पुरवठा करण्‍यात येणार असल्‍याबाबत मनपा पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी कळविले आहे.

अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये महान धरणातून पाणी पुरवठा करण्‍यात येत असतो. महान धरणात आज रोजी १७.९० टक्‍के जलसाठा शिल्‍लक असून, मोठ्या प्रमाणात बाष्‍पीभवन होत आहे. ही बाब लक्षात घेऊन पाणीपुरवठा आता पाच दिवसाआड होणार आहे. शहरातील नागरिकांनी याची नोंद घेऊन पिण्‍याचे पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे असे आवाहन अकोला महानगरपालिका प्रशासनाव्‍दारे नागरिकांना करण्‍यात आले आहे.

आणखी वाचा:

PM Kisan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीएम किसानचा या तारखेला जमा होणार 17 वा हप्ता

पंढरपुरात विठुरायाची मुख्यमंत्र्‍यांच्या हस्ते होणार आषाढीची शासकीय पूजा

 

 

 

Share this article