
Pune: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळीच काम पाहायला येत असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांसह सगळ्यांची फजिती झालेली आपल्याला दिसून येत असते. हिंजवडी येथील कामाची पाहणी करायला अजित पवार सकाळीच आले होते. . या भेटी दरम्यान दादांनी जो कोण मध्ये येईल त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यासोबतच त्यावेळी हिंजवडी गावचे सरपंच यांना दादांनी सर्वांसमोर झापल्याचं दिसून आलं.
कोणीही मध्ये आलं की ३५३ लावायचं. अजित पवार मध्ये आलं तरी लावायचं त्याशिवाय हे काम होणार नाही. आपल्याला संपूर्ण काम करून टाकायचं आहे, असं अजित पवार म्हणाले. त्यानंतर हिंजवडी येथील सरपंच यांनी मंदिर मध्ये येत असल्याचं म्हटलं होत. त्याला यावेळी अजित पवार यांनी सगळ्यांच्या समक्ष झापल्याच दिसून आलं.
अहो असू द्या, असू द्या हो साहेब, धरणं करताना मंदिर जातातच की नाही. तुम्हाला सांगायचं ते सांगा मी ऐकून घेतो, मी काय करायचे ते करतो. आपलं वाटोळं झालं, माझ्या पुण्यातून-महाराष्ट्रातून हिंजवडीचं सगळं आयटी पार्क बंगलोर- हैदराबादला बाहेर चाललं. तुम्हाला काय पडलं नाही. कशाला मी सहा वाजता येतो मला कळत नाही माझी माणसं नाहीत, हे केल्याशिवाय गत्यंतर नाही, असं अजित पवार आक्रमकपणे म्हणाले. त्यावेळी दादांना दिसलं की माध्यमांचे कॅमेरे चालू आहेत तेव्हा त्यांनी, कॅमेरे बंद करायला लावले.
हिंजवडी परिसरातील कर्मचाऱ्यांना त्रासाचा सामना करावा लागतो. त्यामुळं येथ देशभरातून लोक नोकरीसाठी काम करायला येतात. ते काम करायला आल्यामुळं त्यांना चांगल्या सोयी सुविधा हव्या असतात पण त्या न भेटल्यामुळं त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.