
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आज पाचव्या दिवशीही सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी आझाद मैदानात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत केंद्र व राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.