35 वर्षीय क्रिकेटरचा सामन्यावेळी हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू

एका 35 वर्षीय क्रिकेटरचा सामन्यादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. इमरान पटेल असे मृत क्रिकेटपटूचे नाव आहे.

पुण्याला क्रिकेटच्या सामन्यासाठी आलेल्या एका 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. क्रिकेटच्या सामन्यावेळी हृदयविकाराचा झटका आल्याने इमरान पटेल याचा मृत्यू झाला. लीग सामन्यासाठी ओपनिंग बॅट्समन म्हणून इमरानने गरवारे स्टेडियममध्ये पाऊल ठेवला. काही ओव्हर्सनंतरच इमरानने त्याच्या डावा हात आणि छातीच्या येथे दुखत असल्याची तक्रार अंम्पायर यांच्याकडे केली.

यानंतर क्रिकेटच्या मैदानातून पव्हेलियनपर्यंत जाण्यासाठी निघालेला इमरान अचानक खाली पडला. खरंतर, सामन्याचे थेट प्रक्षेपणही त्यावेळी सुरू होते. पटेल याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण रुग्णालयातील डॉक्टरांनी इमरान याला मृत घोषित केले.

इमरान खान यापूर्वीही कोणतीही वैद्यकिय चाचणी झालेली नाही याची माहिती दुसरा क्रिकेटर नसीर खान याने सांगितले. इरमान हेल्दी होता. एवढेच इमारान ऑलरॉइंडर असून त्याला क्रिकेट फार आवडायचे. पण इरमानच्या जाण्यानेही नसीर खान यालाही धक्का बसला आहे.

पटलेच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली आहेत. इमरानवर मौलाना आझाद कॉलेजवळ अत्यंविधी झाला. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवारासह अन्य मंडळींनी मोठी गर्दी गेली होती. पटेल याचा स्वत:चा क्रिकेटचा संघ होता. याशिवाय रियल इस्टेट व्यावसायिकासह ज्यूसचा धंदाही करत होता. इमरानप्रमाणे 7 सप्टेंबरला पुण्यातच हबीब शेख नावाच्या क्रिकेटरचाही सामन्यादरम्यान मृत्यू झाला होता.

आणखी वाचा : 

महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण? अमित शहांसोबतच्या बैठकीत काय घडले वाचा..

सपाच्या नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली मजा, काय म्हटले?

Share this article